गोंदिया : शिवसेना युवासेना गोंदिया जिल्ह्याच्या वतीने आयोजित कार्यक्रमात युवासेना उपजिल्हा प्रमुख पदासाठी नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.अर्जुनसिंह बैस (जिल्हा प्रमुख, युवासेना) यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सहाराम कोरोटे (माजी आमदार तथा महाराष्ट्र राज्य आदिवासी विभाग प्रदेश अध्यक्ष, शिवसेना) यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले.ही नियुक्ती शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे नेत संघटन अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचे पत्रात नमूद आहे.यावेळी मान्यवरांनी नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून आगामी काळात संघटनात्मक कार्य अधिक जोमाने करण्याचे आवाहन केले.सदर प्रसंगी उज्वल बैस (जिल्हा संघटक, युवासेना),मायकल मेश्राम (तालुका प्रमुख, युवासेना सालेकसा),दीपक ठाकरे (तालुका प्रमुख, युवासेना) तसेच विक्की मानकर उपस्थित होते.





