गोंदिया– पक्ष कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात अनेक युवक व कार्यकर्त्यांनी खासदार प्रफुल पटेल यांच्या विकासाभिमुख धोरणांवर विश्वास व्यक्त करत कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते पक्षाचा दुपट्टा परिधान करून सर्वश्री राहुल ठाकुर, पंकज यादव, सुशील बागडे, तेजेश्वर वरकडे, ललित मेश्राम, निलेश वरकडे, हर्ष राउत, शैलेश पर्दे, दर्पण गजभिए, अनिल गराडे, सतीश राउत, निशाल कोसरे, शैलेश वरठे, तेजस सोनवाने, पंकज नेवारे, सोनू मेश्राम, दीपक तिवडे, अजीत गजभिए, सतीश राहंगडाले, मोहन दमाहै, आशीष मेश्राम, निखिल गजभिए, प्रणय बागडे, प्रथमेश चौहान, सूर्या डोंगरे, उदय पांडे, अंश चौहान, लोकेश रंगारी, प्रशाल झारिया, कमलेश खैरवार, विशाल पटले, अश्विन, दिनेश राउत, शाइन राउत, युवराज टेंभुर्णिकर, गौरव डोंगरे, नवजोत कुंभरे, प्रतीक बागडे, किशन दीप, सोभी दुबे, निशान दीप, कुशल दीप, आयुष यादव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला.या प्रसंगी नगरसेवक लोकेश (कल्लू) यादव प्रामुख्याने उपस्थित होते. नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे पक्ष पदाधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले तसेच आगामी राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.





