28.1 C
Gondiā
Sunday, July 26, 2026
Home विदर्भ तिरोडा येथे राजस्व अभियान मोठ्या उत्साहात

तिरोडा येथे राजस्व अभियान मोठ्या उत्साहात

0
89

तिरोडा-तिरोडा येथे “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान – टप्पा क्रमांक १”या शिबिर नगराध्यक्ष अशोक साठी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षण सभापती देवेंद्र तिवारी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले .उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड ,तहसीलदार एन एम ठाकरे ,नगरसेवक संजयसिंह बैश ,नगरसेवक पी.आर.पारधी, मुख्याधिकारी अमोल मालटकर, ठाणेदार अमित वानखेडे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

नगरपरिषद व तिरोडा मंडळ स्तरावरील नागरिकांच्या महसूल विषयक तक्रारी, अडचणी व प्रश्नांची जागेवरच सोडवणूक करणे हा या अभियानाचा मुख्य हेतू आहे. शासन आपल्या दारी ही संकल्पना प्रत्यक्षात आणणारे हे पाऊल आहे. असे मनोगत उद्घाटक देवेन तिवारी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व अभियान समाधान शिबिर स्वर्गीय अटल बिहारी बाजपेयी स्मृती सभागृह स्टेशन मार्ग तिरोडा येथे आयोजित केले होते. या शिबिरात नगरपरिषद, पंचायत समिती, महसूल विभाग व विविध विभागाचे स्टॉल लावण्यात आले होते.या समाधान शिबिरात महसूल विभागाचे उत्पन्नाचे दाखले जात प्रमाणपत्र रहिवासी दाखले सातबारा भोगवटदारांचे वर्ग २ चे वर्ग १ चे प्रलंबित कामे अशा प्रकारचे महसूल विभागासंबंधीत सर्वच प्रकारचे दाखले व इतर कामे करण्यात आले.याकराता शेतकरी विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

blank