27.1 C
Gondiā
Wednesday, September 9, 2026
Home राजकीय नवी जबाबदारी विकासाच्या माध्यमातून सार्थ ठरवू – राजेंद्र जैन

नवी जबाबदारी विकासाच्या माध्यमातून सार्थ ठरवू – राजेंद्र जैन

0
3

राष्ट्रवादी काँग्रेस सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी

आमगाव -तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सत्कार सोहळा विजया लक्ष्मी सभागृह, स्टेशन रोड येथे सत्कारमूर्ती खासदार राजेंद्र जैन तसेच जिल्हाध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले, राजलक्ष्मी तूरकर, माजी म्हाडा सभापती नरेश कुमार माहेश्वरी, सुरेश हर्षे, केतन तुरकर, यांचे उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी खासदार राजेंद्र जैन यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना खासदार राजेंद्र जैन म्हणाले की, खासदारपदी निवड झाल्यामुळे क्षेत्राच्या विकासाची जबाबदारी अधिक वाढली आहे. खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी, शेतमजूर यांच्या पाठीशी सदैव उभे राहून त्यांच्या हितासाठी कार्य केले आहे. नेहमीच शेतकऱ्यांना बोनस व कर्जमुक्ती मिळावी या दृष्टीने सकारात्मक पाठपुरावा केला आहे. गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत पुढे अधिक जोमाने करू. आमगाव परिसराच्या विकासासाठी व विविध प्रश्नांचा पाठपुरावा विशेषतः आमगाव रेल्वे स्थानकावर काही रेल्वे गाड्यांचा थांबा मिळावा यासाठी प्रयत्न करणार आहे.

येणाऱ्या काळात ग्रामपंचायत निवडणुक असून प्रत्येक कार्यकर्त्याने आत्मविश्वासाने आणि एकजुटीने निवडणुकीला सामोरे जावे. पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी गावागावात संपर्क वाढवून नागरिकांच्या समस्या जाणून घ्याव्यात. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांसोबत सदैव उभा राहील.

सर्वश्री  प्रेमकुमार रहांगडाले, राजलक्ष्मीताई तुरकर, कमलबापू बहेकार, राजेश भक्तवर्ती, टीकाराम मेंढे, विनोद कन्नमवार, जियालाल पंधरे, अनिल शर्मा,गणेश हर्षे, पियूष झा, सुभाष यावलकर, चुन्नीलाल शहारे, संजय रावत, रवि क्षिरसागर, स्वप्नील कावडे,रवींद्र मेश्राम,लोकनाथ हरिणखेडे, महेंद्र राहांगडाले, प्रमोद शिवणकर, गिरी महाराज, तुलेंद्र कटरे, सीमाताई शेंडे,कविता राहांगडाले, शिलाताई ब्राह्मणकर, उषाताई हर्षे, लक्ष्मीताई येडे, रुपालीताई भक्तवर्ती, शिलाताई चुटे,सिंधूताई भुते,निलेश्वरी गौतम, उषाताई डोंगरे, कांताबाई रहिले, गायत्री कटरे, संतोष श्रीखंडे, बबलू बिसेन, उमेश बिसेन,ललित ठाकूर, देवराव बिसेन,शामदास बारापात्रे, गिरीश पटले, दिलीप वैरागडे, विजय मुनेश्वर,पुरुषोत्तम चुटे, विजय भांडारकर, विनोद चुटे, हंसराज चुटे,प्रल्हाद वंजारी,कैलाश रहांगडाले, ताराचंद नामूलते,धनराज बोपचे,नामदेव दोनोडे, किशोर बोलणे,किशोर राहांगडाले, महादेव हटवार, प्रकाश राऊत,ऋषी शर्मा, सुरेश अग्रवाल, निखिल पशीने,वासुदेव मडावी, कमलेश बहेकार, बाळाभाऊ महारवाडे, चंद्रपाल राहांगडाले, आनंद शर्मा,दर्शनसिंह बेदी, संजय डोये,बबनभाऊ पटले,लखन चुटे,चुन्नीलाल मिश्रा, कीर्ती बोलणे,छगन बहेकार, हरिचंद फुंडे, भोजराज सोनवाणे, टेकचंद हरीणखेडे, बळीराम तरोणे,तुळशीराम मेंढे,चोपलाल राणे, तुकडोजी राहांगडाले, फागू ब्राह्मणकर, संतोष वंजारी,लक्ष्मण थेर,गणपत फुंडे,गणपत चुटे,चंद्रकुमार बिसेन,धनराज गिरहेपुंजे , उदेलाल गौतम, सेवकराम डोये सहित पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.