पाच जानेवारीला मंत्रिपदाची शपथ घेणार – जानकर

0
17

लातूर-राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात आपल्याला मंत्रिपद मिळणार असून, ५ जानेवारी रोजी मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचा दावा रासपचे महादेव जानकर यांनी लातूर येथे केला.
रविवारी बसव महामेळाव्यात ते बोलत होते. मला खाते कोणते मिळेल हे अद्याप ठरलेले नाही, मात्र मंत्रिपदाची शपथ ५ तारखेला घेईन व मंत्री झाल्यानंतर बसव संशोधन केंद्रासाठी आपण निधी देणार असल्याचे त्यांनी सांगून टाकले. पंतप्रधानांच्या कानात बोलण्याची उंची आपण गाठली असल्याचा दावा करून लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याविषयी मी त्यांना विनंती करणार असल्याचे ते म्हणाले. मंत्री होण्यापूर्वीच कामे रेंगाळत ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांना घरी बसवेन, असेही ते म्हणाले.