गोंदिया, – : महिला आज प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असून यशाचे नवनवीन शिखर गाठत आहेत. राजकारणातही महिलांनी पुरूषांच्या बरोबरीने काम करण्याकरीता शासनाने आता समान अधिकार दिले असून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ५० टक्के आरक्षण प्रदान केले आहे. त्यामुळे आता महिलांनी चूल व मूल या मर्यादेतून बाहेर पडून राजकारणात पुढे यावे व संघटित होवून समाजकारणातून राजकारणाचे धडे घ्यावे, असे आवाहन भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेश महामंत्री व नागपूरच्या माजी महापौर अर्चना डेहनकर यांनी केले.
भाजप जिल्हा कार्यालयात महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सीता रहांगडाले यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी विनोद अग्रवाल यांनी, महिलांनी भाजप सदस्यता नोंदणी अभियान व संपूर्ण स्वच्छ भारत अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी विशेष पुढाकार घेण्याचे आवाहन केले. सीता रहांगडाले यांनी, भाजपचे ध्येय, धोरण व भाजप सरकारच्या योजनांची संपूर्ण माहिती महिला मोर्चाच्या प्रत्येक कार्यकत्र्याने जनतेपर्यंत पोहोवून संघटना मजबूत करण्याचे आवाहन केले.
बैठकीत प्रामुख्याने प्रदेश महिला महामंत्री उमा खापरे, महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम, प्रदेश सदस्य चंदा शर्मा, सविता ईसरका, जि.प. सदस्य योगेश्वरी पटले, कल्याणी कटरे, संगीता दोनोडे, सभापती चित्रकला चौधरी, महामंत्री लक्ष्मी मेंढे, प्रमोदिनी मारवाह, पार्षद श्रद्धा नाखले, सुनिता तरोणे, प्रमिला qसद्रामे, पं.स. सदस्य रेखा लिल्हारे, भारती रहांगडाले, इंद्रायणी रहांगडाले, शीला चव्हाण, गायत्री चौधरी, शकुंतला खजरे, सीता उईके, प्रभा घरजारे, शशीकला मेश्राम, दिवेश्वरी चौधरी, भुमिता येडे, अर्चना श्रीवास्तव, सुनिता बेंदरे, रेणुका रहांगडाले, धर्मशीला साखरे, नीता पटले, चंद्रकला कटरे, वनमाला डहाके, गितेश्वरी चौधरी उपस्थित होते. सभेचे संचालन रूपाली टेंभुर्णे यांनी तर आभार लक्ष्मी मेंढे यांनी मानले.