राजकीय पक्षांना मालमत्ता जाहीर करण्याचे आदेश

0
13

वी दिल्ली- देशातील लोकशाही बळ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणा-या राजकीय पक्षांनी आपल्या जमिनी व बंगले संदर्भातील सर्व कागदपत्रे जाहीर करावीत, तसेच ही माहिती वेबसाइटवर टाकावी, असे आदेश केंद्रीय माहिती आयोगाने केंद्रीय नगरविकास खात्याला दिले आहेत.
राजकीय पक्षांच्या नावावरील जमीन व बंगले असल्यास त्यांनी त्याची माहिती वेबसाइटवर टाकणे बंधनकारक केले आहे. केंद्रीय माहिती आयोगाने केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिका-याला सर्व नोंदणीकृत राजकीय पक्षांशी संबंधित सर्व कागदपत्रे, पत्रव्यवहार, मार्गदर्शक तत्वे आणि अधिसूचना आदींची माहिती चार आठवडयात सादर करण्याचे आदेश दिले. तसेच नगरविकास खात्याकडून सर्व पक्षांची माहिती जाहीर करण्यास सांगितले आहेत.
सामाजिक कार्यकर्ते सुभाष अग्रवाल यांनी राष्ट्रीय जनता दलाच्या मुख्यालयाचे नामकरण ‘राबडी भवन’ केल्याप्रकरणी केंद्रीय माहिती आयोगाकडून माहिती मागवली होती. त्याला पक्षाचे नेते नवलकिशोर राय यांनी हरकत घेतली होती. त्यामुळे अग्रवाल यांना माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी नगरविकास खात्याकडे धाव घेतली. तेथेही त्यांची निराशा झाली. बिहार सरकारने राजद पक्षाला पाटणा किंवा अन्य राज्यांमध्ये भूखंड दिला आहे का याची माहिती अग्रवाल यांना हवी होती. नगरविकास खात्याने दिलेल्या माहितीनुसार, नवी दिल्लीत राजदला कोणताही भूखंड दिलेला नाही, अशी माहिती मिळाली.