बिलोली तालुक्यातील २९ से.स.सोसायटीवर प्रशासकाच्या नियुक्त्या

0
16

बिलोली,दि.14ः- तालुक्यातील २९ सेवा सहकारी सोसायटी मुदत संपल्याने तेथे शासकिय प्रशासक असताना सुद्धा,निवडाणुका झाल्यास आपल्या कार्यकर्त्यांची दाळ शिजणार नाही म्हणून माजी खा.भास्करराव खतगावाकरांनी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष राम पाटील रातोळी कराच्या मदतीने आपल्याच कार्यकर्त्यांची प्रशासकीय चेअरमेन पदी वर्णी लावली.
या नियुक्तीत ठक्करवाड च्या कार्यकर्त्यांना जानिव पुर्वक डावलले.सदर नियुक्त्या जाहीर होताच भाजपाच्या निष्टावान कार्यकर्त्यांत तिव्र असंतोष निर्मान झाले,या नियुक्ती विरुध काँग्रेस ची काही मंडळी हायकोर्टात धाव घेणार असल्याचे कळते.
तालुक्यातील २९ सेवा सहकारी सोसायटीचे मुदत संपल्याच्या कारणा वरुन येथील सहकार साह्यक निबंधक कटके यांनी यांनी सदर सोसायट्या बरखास्त करुन तेथे आपल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना प्रशासक म्हणून नेमले व निवडणुक घेण्या संबधी हालचाली सुरु केल्या.निवडणुका झाल्यास आपल्या कार्यकर्त्यांना गावात विरोध होईल व आपल्या मर्जीतील कार्यकर्ते बहुमताने निवडुन येणार नाहीत अशी पक्की समज झाल्याने भाजपाचे जिल्हा अध्यक्ष राम पाटील रातोळीकर यांच्या मदतीने सहकार मंत्र्या कडुन या २९ सोसायट्या वर एक प्रशासकीय चेअरमेन व दोन सदस्य असे मंडळ नेमले.सदर शिफारस करताना खतगावकरानी ठक्करवाड च्या कार्यकर्त्यांना व शिवसेना कार्यकर्त्यांना जानिव पुर्वक डावलले,वास्तविक पाहता या सर्व तत्कालीन चेअरमनानी बैक च्या निवडणुकीत खतगावकरांना निवडुन दिलेले होते तरी पण आपल्या शिवाय दुसऱ्या कोणाचाही कार्यकर्ता नको या सुडबुद्धीने आपल्याच लोंकाची वर्णी लावली.या नियुक्ती मुळे खतगावकर विरोधात कार्यकर्त्यांत तिव्र असंतोष खदखदत आहे,कारण मागे पार पडलेल्या जिल्हा परिषेद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपच्या एकाही ऊमेदवाराला साथ न देता आपल्या सुनेच्या निवडी साठीच रामतिर्थ मतदार संघातच फिरत राहिले.या नियुक्ती बाबत भाजपच्या एका माजी तालुका अध्यक्ष ची मुलाखत घेतली असता ते म्हणाले की खतगावकरा सारख्या जेष्ठ राजकारणान्याना अशी गटबाजी करणे शोभत नाही ते भाजपमध्ये प्रवेश करताना सर्वाना विचारात घेऊनच काम करेन असे वचन दिले होते तरी पण आपली चाल जाऊ देत नाहीत या बाबत आम्ही वरिष्ठाच्या काणावर टाकू असे सांगितले.
बिलोली तालुक्यात अशोकराव चव्हानच्या च्या नेतृत्वाखाली काँग्रेस ची घौडदौड चालु असुन प्रत्यक्ष निवडणुका झाल्यास आपल्या गटाचा पराभव होईल म्हणून खतगावकरांनी मागच्या दाराने हे प्रशासकीय मंडळ आनले आहे.आम्ही प्रशासकीय मंडळावर कोर्टात धाव घेणार असल्याची माहीती काँग्रेस चे अँन्ड बाबुराव देशमुख यांनी दिली आहे.