विधान परिषदेच्या 4 जागांसाठी 30 तारखेला मतदान

0
21

मुंबई- येत्या 30 जानेवारी रोजी विधान परिषदेच्या 4 जागांसाठी मतदान होत आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विनोद तावडे, आशिष शेलार हे विधानसभेवर निवडून गेल्याने त्यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तर, विनायक मेटे यांचे सदस्यत्व राष्ट्रवादीने पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत रद्द केले होते. दरम्यान, भाजप- शिवसेनेकडे 186 पेक्षा जास्त आमदार असल्याने तीन जागांवर भाजप-शिवसेनेचे उमेदवार निवडून येतील. काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आल्यासच त्यांचा एक आमदार निवडून येऊ शकतो अन्यथा चारही जागा महायुतीच्या पारड्यात जाऊ शकतात.

शिवसेनेकडून सुभाष देसाई यांचे नाव निश्चित आहे. गोरेगावमधून देसाईंचा धक्कादायकरित्या पराभव झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांचे पुनर्वसन करीत उद्योगसारखे खाते दिले आहे. त्यामुळे सहा महिन्यांच्या आत त्यांना विधान परिषदेत निवडून आणणे क्रमप्राप्त आहे. त्यानुसार देसाईंचे नाव पक्के मानले जात आहे. उर्वरित दोन जागांसाठी भाजपमध्येही रस्सीखेच असताना पक्ष नेतृत्त्वाला मित्रपक्षांना संधी द्यावी लागणार आहे. त्यानुसार, सध्या आठवले यांच्या पक्षाला एक आणि महादेव जानकरांना दुसरी जागा मिळू शकते. चौथ्या जागेसाठी सदाभाऊ खोत यांचा विचार होऊ शकतो. मात्र, ही जागा निश्चित मानता येणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने या निवडणुकीसाठी आघाडी न केल्यास महायुतीच्या चारही जागा निवडून येऊ शकतील.