फडणवीस : संपत्ती ४ कोटींच्यावर

0
21

नागपुर-भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती चार कोटी ६७ लाख ३६ हजार ३३६ असल्याचा उल्लेख केला. २००४ मध्ये फडणवीस यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती ३४ लाख ९९ हजार ९५० असल्याचा उल्लेख केला होता.
उमेदवाराला उमेदवारी अर्ज सादर करताना प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीचा अहवालच सादर करावा लागतो. यानुसार २००४ मध्ये तेव्हाच्या पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढविलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी आपली संपत्ती ३४ लाख ९९ हजार ९५० असल्याचा उल्लेख केला होता.
यंदाच्या निवडणुकीत फडणवीस यांनी दक्षिण पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यात स्वतःच्या नावे दोन कोटी चार लाख १४ हजार १३० कोटी रुपयांची आणि पत्नीच्या नावे दोन कोटी ६३ लाख २२ हजार २०६ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचा उल्लेख आहे. २००४ मध्ये फडणवीस यांच्यावर ५ लाख ४८ हजार १९५ रुपयांचे कर्ज होते. २०१४ मध्ये १० लाख १९ हजार ४९८ रुपये कर्ज असल्याचा उल्लेख आहे. बाजारमूल्य वाढल्याने आणि रेडीरेकनरच्या वाढीव दरामुळे आपल्या संपत्तीत वाढ झाल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
१४ हजार रुपयांची बुलेट
फडणवीस यांनी दिलेल्या संपत्तीच्या विवरणपत्रात १० लाख रुपयांची महिंद्रा एक्सयूव्ही ५०० ही गाडी आहे. यासह मोटरसायकल बुलेट असल्याचाही त्यात उल्लेख आहे. मात्र, ही बुलेट केवळ १४ हजार रुपयांची असल्याचा उल्लेख आहे.