नाराजगटाची झाली बैठक

0
6
वाढदिवसाच्या शुभेच्छा

लाखनी- नागपुरातील भाजप नेत्यांनी गोंदिया भंडारा जिल्ह्यातील एकेक नेत्याला बाहेरचा रस्ता दाखविण्याचा एककलमी कार्यक्रम आखला आहे. या कार्यक्रमाचा धसका जिल्ह्यातील ओबीसी बहुजन समाजातील भाजप नेत्यांनी चांगलाच घेतला आहे. तिरोड्यातून डॉॅ.बोपचेंच्या उमेदवारी कपातीनंतर तर भाजपमधील नाराजगटाची गुप्त बैठक पार पडली. गोंदिया मतदारसंघात ओबीसींवर झालेल्या अन्यायाबद्दलच नव्हे तर तिकीट वाटपात सुद्धा दोन्ही जिल्ह्यात चांगल्या उमेदवारांना डावलण्यात आल्यावर चर्चेची खलबते सुरू झाली.
या बैठकीची हवा संघटन मंत्र्याना लागताच म्हणे आशिष वांदिले व उपेंद्र कोठेकर नामक व्यक्तींनी झाले गेले विसरून जा, आपल्या पक्षाच्या उमेदवारासाठी कामाला लागण्याच्या केलेल्या विनंतीला सुद्धा त्या नाराज गटातील आजी माजी सर्वच आमदार, खासदार,जि.प.पदाधिकाèयांनी लाथाळल्याचे समजते.