‘संकल्प से सिध्दीङ्कतून नवभारताचा निर्माण करा : डॉ.कोठेकर

0
11
गोरेगाव,दि.30 : सन १९४२ मध्ये  इंग्रजांना भारत छोडोचा नारा दिला होता. त्याच्या ५ वर्षानंतर १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. त्याचप्रमाणे देशातील कुरितींना पळवून लावण्याकरीता व नव्या भारताच्या निर्माणाकरीता आज संकल्प घेण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवभारताच्या निमार्णाकरीता संकल्प से सिध्दी हा कार्यक्रम हाती घेतला असून प्रत्येक भारतवासीयांनी हा संकल्प करून  सन २०२२ पर्यंत  देशाला सुजलाम् सुफलाम् करायचे आहे, असे प्रतिपादन भाजपचे विदर्भ संघटन मंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर यांनी केले.
ते २८ ऑगस्ट रोजी गोरेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा बैठकीत बोलत होते. जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीत प्रामुख्याने पालकमंत्री राजकुमार बडोले, आमदार डॉ.परिणय फुके, आ. विजय रहांगडाले, आ.संजय पुराम, जिल्हा प्रभारी सुभाष पारधी, माजी खासदार चुन्नीभाऊ ठाकूर, डॉ.खुशाल बोपचे, माजी आमदार केशव मानकर, भजनदास वैद्य, खोमेश रहांगडाले, माजी जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे, गोंदिया नगराध्यक्ष अशोक इंगळे, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, तिरोडा नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, महिला मोर्चा प्रदेश सचिव सिता रहांगडाले, जिल्हा महामंत्री संघटन विरेंद्र अंजनकर, जिल्हा महामंत्री भाऊराव उके, रविकांत बोपचे, लायकराम भेंडारकर, जिल्हा संपर्क प्रमुख संजय कुलकर्णी, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष भावना कदम, भाजयुमो जिल्हाध्यक्ष पंकज रहांगडाले, जि.प.सभापती छायाताई दसरे, देवराज वडगाये, ओबीसी आघाडी प्रदेश सचिव विरेंद्र जायस्वाल, न.प.उपाध्यक्ष शिव शर्मा, आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष हनुवत वट्टी, अल्पसंख्यक आघाडी जिल्हाध्यक्ष अल्ताफ हमीद, अनु.जाती आघाडी जिल्हाध्यक्ष रतन वासनिक, झामसिंग येरणे, रजनी नागपुरे, धनंजय तुरकर आदि उपस्थित होते. यावेळी माजी खा. ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला.
पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,  पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात आज देशाची शक्ती वाढली आहे. डोकलाम मुद्यावर चीनची माघार हा मोठा विजय आहे. सरकार जिल्ह्यातील पीक परिस्थितीशी अवगत असून शेतकक्तयांच्या पाठीशी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात ऐतिहासिक कर्जमाफी केली आहे. विरोधक सत्ता असताना काही करू शकले नाही. मात्र आता शेतकक्तयांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
प्रास्ताविकातून जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी आगामी ग्राम पंचायत निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करण्याचे सांगून राबविण्यात येणाक्तया कार्यक्रमांची माहिती दिली. डॉॅ.परिणय फुके यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना या अंतर्गत कर्जमाफी नसून कर्जमुक्त करून शेतकक्तयांचा आर्थिक विकास करण्यासाठी मुख्यमंत्री कार्य करीत असल्याचे सांगून अभिनंदन प्रस्ताव मांडला.आमदार विजय रहांगडाले यांनी शासनाच्या योजनांची माहिती दिली व अभिनंदन प्रस्तावाचे अनुमोदन केले. रचना गहाणे यांनी प्रदेश बैठकीत झालेल्या कार्याची व ठरावाची माहिती दिली. यावेळी प्रभारी सुुभाष पारधी यांंनी सुध्दा मार्गदर्शन केले. नानिकराम टेंभरे यांची आध्यात्मिक आघाडी जिल्हाध्यक्षपदी नियुक्तीची घोषणा करण्यात आली. सभेचे संचालन जिल्हा महामंत्री विरेंद्र अंजनकर यांनी केले. राष्ट्रगीताने सभेचे समापन झाले.