गोंदिया : काही चुकांमुळे आम्हाला केंद्र व राज्यातही सत्ता गमवावी लागली. भाजपने सर्वांना भूलथापा देत सत्ता मिळविली. पण कार्यकर्त्यांनी निराश होऊ नये. भाजप सरकारने जनतेला दिलेली आश्वासने हवेत विरत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी ही बाब जनतेपर्यंत पोहोचवून आगामी जिल्हा परिषदेची निवडणूक एकजुटीने लढवावी आणि जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता आणावी, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केले.
येथील अग्रसेन भवनात सायंकाळी झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी मंत्री डॉ.नितीन राऊत, आ.गोपालदास अग्रवाल, माजी आ.रामरतन राऊत, सेवक वाघाये, डॉ.नामदेव उसेंडी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, डॉ.योगेंद्र भगत, डॉ.नामदेव किरसान, अशोक लंजे, झामसिंग बघेले, पी.जी.कटरे, पन्नालाल सहारे, उषा मेंढे, नवटवलाल गांधी, रजनी नागपुरे, छाया चव्हाण, प्रफुल्ल अग्रवाल यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांनी सत्ताधारी भाजप सरकारवर चांगलेच प्रहार केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान मोदींच्या हातचे बाहुले असल्याचे सांगून राज्याची राजधानी मुंबईवर मोदींचा डोळा आहे. केवळ व्यापार्यांचे हित जोपासणार्या मोदी सरकारला शेतकर्यांचे दु:ख कळत नाही. आजही दररोज शेतकर्यांच्या आत्महत्या होत असताना हे सरकार काय करीत आहे? असा सवाल त्यांनी केला. निवडणुकीच्या काळात शेतकर्यांचा पुळका आलेले सरकार आता गप्प का? असेही ठाकरे म्हणाले.
भाजपला रोखण्यासाठी एकजुटीने लढा
वाढदिवसाच्या शुभेच्छा