भंडा-यात उद्धव ठाकरेंची सभा रविवारी

0
10

भंडारा- येत्या १५ ऑक्टोबरला होणाèया महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीतील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जिल्ह्याच्या दौèयावर आहेत. स्थानिक दसरा मैदानात रविवारी ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत भंडाराचे उमेदवार नरेंद्र भोंडेकर,तुमसरचे इंजि.राजेंद्र पटले, साकोलीचे प्रकाश पडोळे,अर्जुनी मोरगावच्या किरण कांबळे, तिरोड्याचे पंचम बिसेन, गोंदियाचे राजकुमार कुुथे आणि आमगाव येथील शिवसेनेचे उमेदवार मूलचंद गावराने यांच्या संयुक्त प्रचार सभेला ते मार्गदर्शन करणार आहेत.