ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी साथ द्या

0
13

गोंदिया,दि.14 : जीवनाश्वक वस्तूंचे वाढते दर आणि वाढत्या महागाईमुळे जनता त्रस्त आहे. भाजपा सरकारने सामान्य जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवून त्यांची दिशाभूल केली. मात्र काँग्रेस पक्षाने सुरूवातीपासूनच दिलेला शब्द पाळला. ग्रामीण भागाच्या सर्वांगिन विकासासाठी सर्व जनतेनी साथ द्यावी. काम करणाºयांच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहावे, असे प्रतिपादन आ.गोपालदास अग्रवाल यांनी येथे केले.
तालुक्यातील अर्जुनी येथे आयोजित सभेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी जि.प.सभापती विमल नागपूरे, जि.प.सदस्य विजय लोणारे, विठोबा लिल्हारे, रमेश अंबुले, सीमा मडावी, शेखर पटले, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती धनलाल ठाकरे, माजी सभापती स्रेहा गौतम, उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, चमन बिसेन, मनिष मेश्राम, प्रमिला करचाल, योगराज उपराडे, अनिल मते, आशिष गणविर, रुद्रसेन खांडेकर उपस्थित होते. आ.अग्रवाल म्हणाले, सरकारने नोटबंदी करुन जनधनच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आश्वासन जनतेला दिले होते.
त्या आश्वासनाची देखील त्यांनी पूर्तत: केली नाही. शेतकºयांना ऐतिहासीक कर्जमाफी दिल्याचे श्रेय भाजपाचे नेते लाटत आहे. मात्र दुसरीकडे कर्जमाफीसाठी विविध अटी शर्ती लागू करुन शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यापासून वंचित ठेवल्याचा आरोप अग्रवाल यांनी केला. काँग्रेसने मागील दहा वर्षांत धानाच्या हमीभावात वाढ करुन दर १४७० रुपयांपर्यंत पोहचविले. तर सत्तेवर आल्यास धानाला प्रती क्विंटल ३ हजार रुपये भाव देऊ असे आश्वासन भाजप सरकारने दिले होते. मात्र त्या आश्वासनाची देखील पूर्तत: केलेली नाही. काँग्रेसने नेहमीच ग्रामीण भागाच्या विकासाला प्राधान्य दिले. ग्रामीण भागाचा कायापालट करणे हेच आमचे मुख्य ध्येय असून जनतेनी साथ देण्याचे आवाहन अग्रवाल यांनी केले.