शिवसेनेला संधीचे सोने करण्याची गरज!

0
24

गोंदिया-जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचा ज्वर चांगलाच चढला असून शिवसेनेलाही आता आपली खरी ओळख आणि ताकद दाखविण्याची संधी मिळाली आहे. गेल्या २५ वर्षापासून असलेली युती तोडून भाजपने स्वबळाची भाषा वापरली आहे. भाजपने शिवसेनेला दिलेले आव्हान गोंदिया जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, नेते आणि मतदारांना पेलवते काय, यावरच जिल्ह्यातील निकालाचे चित्र ठरणार आहे. परिणामी, शिवसेनेने मिळालेल्या संधीचे सोने करण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात सेनेला या जिल्ह्यात भाजप बॅकफूटवर ढकलल्या शिवाय राहणार नाही.
सध्याच्या स्थितीवर नजर टाकल्यास गोंदिया मतदारसंघ हा सेनेचा बालेकिल्ला आहे. परंतु, गेल्या दोन निवडणुकीत सेनेचा हा बुरूज सेनेतील गटबाजीमुळे ढासळला. शिवसेनेचा हा बालेकिल्ला सर करण्यासाठी भाजप केव्हाचीच आसुसलेली होती. आता भाजपच्या स्वबळाला सेनेने प्रत्युत्तर देण्याची खरी गरज आहे. सेनेने ही जागा qजकली आणि सत्तेत आली तर गंोंदियातून भाजपचा पराभवच नव्हे तर काँग्रेसच्या दि१⁄२गजाला हरविल्याचा पुरस्कार मंत्रिमंडळात स्थान देऊन केला जाऊ शकतो. शिवसेनेचा दोन जिल्हाध्यक्षांमधील मतभेदाचा लाभ काँग्रेस राष्ट्रवादीसह भाजपही घेत आली आहे. परंतु, यावेळी तर खुद्द दोन्ही जिल्हाध्यक्षांवरच स्वतःची इभ्रत वाचविण्याची वेळ आली आहे. राजकुमार कुथे हे स्वतः एक जिल्हाध्यक्ष असून विधानसभेचे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचाराची धुरा त्यांचे बंधू माजी आमदार रमेश कुथे यांनी आपल्या हातात घेतली आहे. त्यांच्यासोबत दुसरे जिल्हाध्यक्ष मुकेश शिवहरे सुद्धा तेवढ्याच ताकदीने मैदानात आहेत. गोंदिया जिल्ह्यात चारही विधानसभेच्या जागा शिवसेना लढवीत आहे. तरी गोंदिया,तिरोडा आणि अर्जुनी मोरगाव या मतदारसंघातील उमेदवार हे भाजप काँग्रेसच्या उमेदवारांचे पानिपत करण्यासाठी आपला स्वभाव आणि इतर पक्षातील विरोधकांच्या माध्यमातून चांगले नियोजन केले तर या तिन्ही जागी शिवसेनेचा भगवा जिल्ह्यात पहिल्यांदा निश्चितपणे फडकू शकतो, अशी परिस्थिती असल्याचे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत.
तिरोड्यातून सेनेचे पंचम बिसेन यांचा स्वभाव आणि त्यांची सामाजिक कार्याची तळमळ व सर्वच पक्षातील मतदारांशीच नव्हे तर नेत्यांशी असलेले मधुर संबंधाचा लाभ घेतल्यास आणि स्थानिक सेनेच्या पदाधिकाèयांनी आपले भाजप उमेदवारांशी असलेल्या संबंधाला थोडे दूर ठेवले तर या मतदारसंघातही चमत्कार घडू शकतो. फक्त शिवसेनेच्या पदाधिकाèयांना राजकीय व वैयक्तिक मैत्री काही दिवसापुरती बाजूला सारण्याची गरज आहे.
स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या हाताने ओळखपत्र मिळणारे अनेक सेनेचे कार्यकर्ते या मतदारसंघात आजही आहेत. त्यांना फक्त जवळ करण्याची आणि काँग्रेस राष्ट्रवादी व भाजपमधील मतभेदाचा लाभ घ्यावयाचा आहे.
अर्जुनी मोरगाव मतदारसंघातही सेनेची आधीपासूनच ग्रामीण भागात पकड आहे. त्यातही यावेळी जिल्हा परिषद सदस्या आणि महिला उमेदवार असलेल्या किरण कांबळे यांच्या रूपाने पक्षाला धडाडीच्या उमेदवार मिळाल्या आहेत. मतदारसंघातील प्रत्येक गावाचा अनुभव आणि गावातील मतदारांची ओळख असलेल्या त्या उमेदवार आहेत.
भाजपमध्ये ठेकेदार लॉबीचा सुद्धा विद्यमान आमदाराला विरोध दिसून येत आहे. या मतभेदाचा लाभ शिवसेनेच्या किरण कांबळेंना मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या ठिकाणी सर्वच पक्षाचे उमेदवार प्रबळ दावेदार असून किरण कांबळे आणि भीमराव मेश्राम वगळता या तालुक्यातील दुसरा कुठला उमेदवार मोठ्या राजकीय पक्षाचा नसल्याने त्याचाही लाभ सेनेच्या उमेदवाराला मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.