मोरगावअर्जूनी विधानसभा निवृत्त अधिका-यांत रंगणार द्वंद

0
11
वाढदिवसाच्या शुभेच्छा

खेमेंद्र कटरे
गोंदिया- जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव या राखीव मतदारसंघाकडे संपूर्ण जिल्ह्यातील मतदारांसह प्रशासकीय अधिकाèयांचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघातून एक, दोन तर नव्हे तब्बल तीन निवृत्त अधिकारी विविध पक्षाच्या माध्यमातून आमदारकीचे स्वप्न बघत आहेत. त्यासाठी ते निवडणुकीच्या समरभूमित पाय रोवून एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
यापैकी तिघांची नोकरी ही गोंदिया जिल्ह्यात राहिली असून दोघांची तर जिल्हा परिषद गोंदियातत गेली. त्यामुळे या मतदारसंघाच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यापैकी दोन उमेदवारांची नोकरीतील कारर्कीद ही नोकरभरतीतील गैरव्यवहाराला घेऊनच चांगलीच गाजली होती, हे येथे विशेष.
आपल्या राजकीय दबावासोबतच अधिकारी संघटनेच्या माध्यमातूनच नव्हे तर आर्थिक पातळीवर सुद्धा त्या नोकरभरतीतील गैरव्यवहाराला लपविण्यासाठी बरेच काही आटापिटा केला होता, हे जनतेला ठाऊक आहे. त्या अधिकाèयांमध्ये जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातून सेवानिवृत्त झालेले मनोहर चंद्रिकापुरे आणि जिल्हा आरो१⁄२य अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले डॉ.भीमराव मेश्राम यांचा नामोल्लेख होतो. हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
विद्यमान आमदार इंजि.राजकुमार बडोले हे दुसèयांदा भाजपकडून रिंगणात आहेत. बडोले हे गोंदिया जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागात शाखा अभियंता म्हणून नोकरीला होते. त्यांनी २००९ मध्ये राजीनामा देऊन निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली होती. यावेळी मात्र जे इतर उमेदवार आहेत ते सेवानिवृत्त झाल्यानंतर रिंगणात उतरले आहेत. यामध्ये डॉ. भीमराव मेश्राम हे बहुजन समाज पक्षाकडून, मनोहर चंद्रिकापुरे हे राष्ट्रवादी काँग्रेस कडून रिंगणात उतरले आहेत. या चौघांपैकी राजकीय अनुभवाचा विचार केल्यास बडोले शिवाय कुणाकडेही राजकारणाचा अनुभव नाही.
परंतु, मनोहर चंद्रिकापुरे यांचे बंधू लक्ष्मणराव चंद्रिकापुरे यांच्यामुळे त्यांना थोडा अनुभव आहे, तो कामात येतो काय याकडे लक्ष लागले असून या चार अधिकाèयांपैकी कोण यावेळी अजुμ्र्रनीमोरगाव मतदारसंघातून आमदारकीची माळ आपल्या गळ्यात पाडतो, याकडे लक्ष लागले आहे.
डॉ.मेश्राम हे स्थानिक तालुकावासी असल्याने त्यांना कितपत लाभ मिळतो.आणि मनोहर चंद्रिकापुरे यांना सेवानिवत्तीनंतर केलेल्या शेतकरी हितपयोगी कामाचा लाभ किती मिळतो याकडे लक्ष लागले आहे.आहेत. हे या मतदारसंघातील मतदारांना सुद्धा ठाऊक आहे.