आघाडी-युतीत बिनसल्याने उमेदवारांच्या चिता वाढल्या

0
10

देवरी-आमगाव विधानसभेची निवडणूक होणार चौरंगी

नागपूरचे बिल्डरही निवडणुकीच्या रिंगणात

देवरी-विधानसभा निवडणुकीची तुतारी वाजते न् वाजते, तशी देवरी-आमगाव विधानसभा मतदार संघातील प्रमुख पक्षांच्या संभाव्य उमेदवारांना स्फुरण चढल्याचे येथील मतदारांनी अनुभवले होते. कोणाला मोदींच्या नामाचा तर कोणाला आपण केलेल्या कामाचा अभिमान होता. आपणच आमदार होणार, या तोèयात सर्व संभाव्य उमेदवार वावरत होते. राज्यात युती-आघाडीचे काही जमत नसताना सुद्धा या उमेदवारांनी शेवट पर्यंत आशा सोडली नव्हती. एकमेकांचे उणेदुणे काढायला सुरवात झाली होती.
शेवटी व्हायचे तेच झाले. राज्यात स्वबळाची वल्गना सर्वच राजकीय पक्षांनी केली आणि देवरी-आमगाव विधानसभा मतदारसंघातील सर्वच प्रमुख पक्षांच्या उमेदवारांच्या जणू तोंडचे पाणीच पळाले. परिणामी, आपण हमखास निवडून येणार याची शाश्वती एकालाही नसल्याने आणि चौरंगी लढतीचे चित्र निर्माण झाल्याने उमेदवारांसह कार्यकत्र्यांची दमछाक होताना दिसत आहे. दरम्यान, नागपूरचे बिल्डर ही या मतदारसंघातून आपले भा१⁄२य अजमावीत आहेत.
गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदींनी करिष्मा केला आणि भाजपला त्यांच्या कल्पनेपलीकडील यशप्राप्ती झाली. याचा प्रभाव आजही भाजपच्या नेत्यांवर आहे. त्यातून आमगाव विधानसभा मतदार संघही सुटू शकला नाही. आमदार होण्याची १०० टक्के खात्री वाटू लागल्याने प्रत्येकाला आमदारकीचे स्वप्न पडू लागले. त्यामुळे राज्यात सत्तेची स्वप्ने पाहणाèया भाजपत मोठ्या प्रमाणावर गटबाजी उफाळून आली. गेल्या निवडणुकीत पराभूत झालेले रमेश ताराम यांची पक्षनिष्ठा पाहता त्यांनाच तिकीट फायनल होणार, अशी आशा भाजपतील एका मोठ्या गटातील कार्यकत्र्यांची होती. दुसरीकडे, संघनेत्यांनी युवा आणि अभ्यासू तसेच प्रभावी नेतृत्व गुण असल्याचे सांगत संजय पुराम या युवा नेत्यासाठी फिल्डिंग लावली. याचवेळी सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याचे दाखवत मुख्य व्यवसायाने बिल्डर म्हणून ओळखले जाणारे आणि स्वतःला पक्षनिष्ठ म्हणवून घेणारे सहसराम कोरोटे यांनी ‘एकला चलो रेङ्क च्या धर्तीवर या क्षेत्रात आपला संपर्क वाढविण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी सामाजिक कार्याचा बुरखा पांघरून त्यांनी गेल्या एकदोन वर्षापासून नाटक आणि इतर कार्यक्रमाच्या माध्यमातून देणगी देण्याचा सपाटा चालविला असल्याचे बोलले जाते. पैशाच्या जोरावर कार्यकर्ते उभे करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे दिसून येते.
एकंदर कोरेटी हे नागपूर येथील बिल्डर असून त्यांनी आमदारकीच्या हव्यासापोटी या क्षेत्रात आपले पाय रोवण्याची तयारी चालविल्याचा आरोपही त्यांचे विरोधक करतात. लक्ष्मीदर्शनाच्या लोभाने त्यांच्या भोवती असलेला गोतावळा हा खिसे गरम असे पर्यंतच गळा काढणार असल्याचाही मतप्रवाह आहे. व्यवसायाने बिल्डर असलेले कोरेटी हे अतिमहत्त्वाकांक्षी असल्याने व त्यांना पक्षापेक्षा स्वतःच्या विकासाचीच qचता अधिक असल्याने पक्षाने त्यांना त्यांची जागा दाखविल्याचे भाजप वर्तुळात चर्चिले जात आहे.
लक्ष्मीच्या जोरावर निवडणूक qजकू पाहणारे कोरेटी हे खरोखरच्या या भागातील जनतेशी इमान राखतील काय? असा प्रश्न मतदारांना पडला आहे. एकीकडे भाजपमध्ये तिकिटासाठी गुद्दमगुद्दी असताना दुसरीकडे मात्र काँग्रेसपक्षात विद्यमान आमदारांना स्पर्धा करू शकेल, असा तगडा प्रतिस्पर्धी नसल्याने रामरतन राऊत हे बिनधास्त होते. इतर पक्षांनी ही निवडणूक तेवढी गांभीर्याने घेतली नसल्याने सर्वच बेसावध होते. कोणीही स्वपक्षाची या क्षेत्रात मार्केqटग करीत नव्हता. शेवटी स्वबळाची घोषणा झाली आणि सर्वांची पळापळ सुरू झाली. उमेदवार शोधूनही सापडेना. मिळेल त्याला ‘बाqशग बांधाङ्क, अशी अवस्था बिगर भाजप-काँग्रेसवाल्यांनी झाली. शेवटी ‘धरा, बांधा आणि उभे कराङ्क, तंत्राचा वापर झाला. काँग्रेस आणि भाजप सोडले तर इतर पक्षाचे उमेदवार बिनधास्त आहेत. कारण त्यांच्यापेक्षा त्यांना उभे करणाèयांचीच इभ्रत वेशीवर आहे.
या मतदार संघात चौरंगी लढतीचे चित्र निर्माण केले जात आहे. विद्यमान आमदार रामरतन राऊत, भाजपचे संजय पुराम, राष्ट्रवादीचे रमेश ताराम, अपक्ष सहसराम कोरेटी यांनी सद्यपरिस्थितीत प्रचारात आघाडी घेतली आहे. तुलनेने या मतदारसंघात शिवसेना अत्यंत दुबळी वाटत आहे. संघटन वाढीचे येथील नेत्यांनी कधीही प्रयत्न न करता आपण कसे मोठे होणार, यावर भर दिल्याचे हे फलित असल्याचे बोलले जाते. त्यामुळे बेसावध असलेल्या नेत्यांवर ‘उमेदवार होता का भाऊङ्क, म्हणण्याची पाळी आली. आजही शिवसेनेचे नेते हे पक्षाच्या भल्यासाठी कार्य करतील, याचा मतदारांना विश्वास वाटत नसल्याने राज्यातील प्रमुख पक्ष असलेली सेना या मतदार संघातून जवळपास बाद झाल्यात जमा आहे. तीच अवस्था राष्ट्रवादी काँग्रेसची होती. आघाडी तर तोडली, पण आमगावातून कोणाला लढविणार, हा खरा प्रश्न होता. ऐनवेळी कसेबसे तासाभरात भाजपने नाकारलेले रमेश ताराम यांनी राष्ट्रवादीच्या मदतीला धावून आले. असे असले तरी रमेश ताराम यांच्यामुळे ही निवडणूक रंगतदार ठरत असल्याचे मत जाणकार व्यक्त करीत आहेत.
भाजपमधील दुखावलेला बहुजन समाज हा रमेश तारामांवर मेहरबान होण्याची शक्यता आहे. तसेही ताराम यांच्यापेक्षा खरी खुन्नस आहे, ती राष्ट्रवादीचे नरेश माहेश्वरी यांनाच. कारण विद्यमान आमदार रामरतन राऊत यांच्यामुळे माहेश्वरी हे आमदार होता होता राहिले. त्यामुळे ही निवडणूक ताराम यांच्यापेक्षा माहेश्वरी यांच्या प्रतिष्ठेची झाली आहे. शिवाय राष्ट्रवादीचे क्रमांक दोनचे नेते प्रफुल पटेल यांच्यासाठीही ताराम यांचा विजय महत्त्वाचा आहे.
बसपचा हत्ती या निवडणुकीत केवळ आपले अस्तित्व दाखविण्यासाठी मैदानात उतरला आहे. दुसरीकडे रामरतन राऊत हे आपल्या विकास कामांच्या भरवशावर विजयाची आशा लावून आहेत. परंतु, स्वपक्षात त्यांची लोकप्रियता मात्र बरीच घटली आहे. आमदार झाल्यानंतर त्यांनी पोसलेला गोतावळा त्यांच्या पराभवाचे कारण तर होणार नाही ना, अशी qचतेची लकेर त्यांच्या चेहèयावर स्पष्ट जाणवते. आपण केलेल्या विकास कामांचे न केलेले मार्केqटग आणि चौकडीवर दाखविलेला फाजील आत्मविश्वास त्यांना कोठपर्यंत तारतो, हे निकालानंतरच स्पष्ट होऊ शकेल. सद्यःस्थितीत सर्वच उमेदवार हे निवडणूक सोपी नसल्याचे उदारमनाने खासगीत कबूल करीत आहेत.