मंगळवारला अर्जुनी-मोर येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा

0
15

अर्जुनी-मोरगाव,दि.२२: अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदार संघ कााँग्रेस कार्यकत्र्यांचा मेळावा २३ जानेवारी मंगळवारला दुपारी २ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात आयोजित करण्यात आले आहे. या कार्यकर्ता मेळाव्याचे उद्घाटन माजी खासदार नाना पटोले यांच्या हस्ते गोंदिया जिल्हा काँग्रेस कमेटी अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. कार्यक्रमाला माजी आमदार रामरतन बापू राऊत, माजी जि.प. अध्यक्ष टोलqसह पवार, अ‍ॅड.के.आर.शेंडे, चंद्रशेखर ठवरे, प्रदेश काँग्रेस कमेटी सचिव डॉ. योगेंद्र भगत, विनोद जैन, नामदेवराव किरसान, जिल्हा काँग्रेस महासचिव अमर वèहाडे, आरोग्य व शिक्षण सभापती पी.जी.कटरे, माजी सभापती अशोक लंजे, सरिता कापगते, राजेश नंदागवळी, करुणा नांदगावे, ज्योती वालदे, गिरीष पालीवाल, आशा झिलपे, विशाला शेंडे, रामलाल राऊत, नगराध्यक्ष पोर्णिमा शहारे आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला काँग्रेस कार्यकत्र्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भागवत नाकाडे, शेषराव गिरीपुंजे, डेमेंद्र रहांगडाले, डॉ. विवेव मेंढे, कांताबाई पाऊलझगडे, गायत्री इरले, कौतुका चव्हण, सिद्धार्थ टेंभुर्णे आqदनी केले आहे.