समाजाच्या हितासाठी प्रयत्न करा-सरोजताई वाघाये

0
21

लाखनी -समाजाने आपल्याला घडवले आहे, आपल्या समाजाप्रती आपलं काही देणे लागते म्हणून आपल्या समाजातील लोकांनी समाजकार्यात रस घेतला पाहिजे. समाजहितासाठी प्रयत्न करायला पाहिजे. वार्षिक मेळाव्याच्या निमित्ताने समाजबांधव भगिनी भेटतात, एकत्र येतात. पर्यायाने समाज वृद्धिंगत होतो म्हणून वार्षिक मेळावा यांसारखे कार्यक्रम आयोजित करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन लक्ष्मी शिक्षण संस्थेच्या कोषाध्यक्षा सरोजताई वाघाये यांनी केले. त्या कुणबी समाज मंडळ लाखनीद्वारे आयोजित वार्षिक मेळावा कार्यक्रमात अध्यक्षस्थानाहुन बोलत होत्या. कार्यक्रमाच्या उद्घाटक भंडारा येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मंगला डहाके तर प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध वक्त्या सुनीता हुमे, जीएसटी निरीक्षक सिमा ठवकर, महिला समिती अध्यक्षा आशा वनवे, प्रामुख्याने उपस्थित होते. सन्माननीय अतिथिंच्या हस्ते तुकाराम महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
विविध स्तरावरील गुणवंत विद्यार्थी आणि खेळाडूंचा याठिकानी सत्कार करण्यात आला. महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, उखाणे म्हणणे, पुष्पगुच्छ बनवने आदी स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्याचे बक्षिस वितरण देखील यावेळी अतिथिंच्या हस्ते करण्यात आले.महिलांचा सहभाग समाजकार्यात वाढावा, महिलांचा कलाकौशल्याचा फायदा समाजाच्या वाढीसाठी व्हावा यासाठी महिलांचं एक संघटन तयार करून त्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत असा मानस महिला समिती अध्यक्ष आशा वनवे यांनी यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मंडळाच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष जयकृष्ण फेंडरकर यांनी तर संचालन महिला समिती सहसचिव स्मिता सिंगणजुडे व आभार प्रदर्शन शालु उरकुडे यांनी केले. कार्यक्रमाला , अर्चना ढेंगे, अंजना पिंपळशेंडे, मीनाक्षी सिंगणजुडे, सारिका रेहपाडे, दुर्गा अतकारी, उमा टिचकुले, स्वाती ढेंगे, वर्षा पंचबुद्धे, अलका खटके, हर्षदा कमाने, सविता लुटे, शैला सार्वे, अश्विनी वाघाये, संगीता बांडेबूचे, रामदास सार्वे, उमराव आठोडे,  माधवराव भोयर, गंगाधर लुटे, मधु मोहतुरे, संजय वनवे, बालू फसाटे, नितेश टिचकुले तसेच सर्व समाजबांधवांचे सहकार्य लाभले.