तीन जि.प.सदस्य पोचले विधानसभेत

0
17
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोंदिया-गेल्या १५ आँक्टोबरला महाराष्ट्र विधानसभेकरिता झालेल्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले.त्या निकालाकडे बघितल्यास गोंदिया/भंडारा लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच ३ जिल्हा परिषद सदस्य हे विधानसभेत पोचले आहेत.ते सुध्दा भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडून येऊन.गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा विधानसभा मतदारसंघातून विद्यमान जिल्हा परिषद सदस्य असलेले विजय रहागंडाले हे भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडून येऊन त्यांनी विधानसभेत प्रवेश केला आहे.तर तुमसर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चरण वाघमारे यांनीही पहिल्यांदाच विधानसभेत प्रवेश केला आहे.मागच्या निवडणुकीत वाघमारे यांनी निवडणूक अपक्ष लढविली होती,यावेळी मात्र भाजपकडून ते निवडून गेले आहेत.तर साकोली मतदारसंघातून एकोडी जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य बाळा काशीवर हे निवडून आले आहेत.यापूर्वी गोंदिया जिल्ह्यातून जिल्हा परिषद सदस्य असताना दिलीप बनसोड,केशव मानकर,भैरqसह नागपूरे,हेमंत पटले हे विधानसभेत आमदार म्हणून गेले होते.