पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराकरिता येथील इंदिरा गांधी स्टेडिअमवर सभा घेतली. स्टेडिअमची क्षमता २५ हजार होती. गर्दी भन्नाट होती. मात्र, बसण्यास जागा नसल्यामुळे भाषण ऐकण्याकरिता आलेल्या अनेकांना परत जावे लागले होते. त्यामुळे परत गेलेल्यांची मते परावर्तित होण्याऐवजी भाजपच्या विरोधात गेली. त्यानंतर दोन्ही जिल्ह्यांतील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचाराकरिता सोनिया गांधी यांनी येथील सर्कस मैदानात सभा घेतली. त्या सभेला मोदींच्या सभेपेक्षा जास्त गर्दी जमली. त्यामुळे काँग्रेसचा विजय गोंदियात तरी निश्चित झाल्याचे मत व्यक्त करण्यात येत होते. त्याची प्रचिती आजच्या निकालावरून आली. मोदी लाट आणि त्यांच्या भाषणाचा प्रभाव गोंदिया मतदार संघातील मतदारांवर चालला नाही.