35.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home राजकीय नवीन काहीच नव्हते राष्ट्रपतींच्या अभिभाषणात – सोनिया

नवीन काहीच नव्हते राष्ट्रपतींच्या अभिभाषणात – सोनिया

0
31

blank

नवी दिल्ली – राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला केलेल्या अभिभाषणात नवीन असे काही नव्हते. राष्ट्रपतींनी या अभिभाषणातून संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्याच काही योजनांची नव्याने माहिती दिल्याची प्रतिक्रिया काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी दिली आहे. ‘नवीन मुद्देच अभिभाषणात नव्हते. यूपीए सरकारच्या काही योजना सुधारित स्वरुपात सादर करण्यात आल्या.’ असे सोनिया यांनी सांगितले. दरम्यान, राहुल गांधी या अधिवेशनात अनुपस्थित होते. याविषयी त्यांना विचारले असता सोनिया म्हणाल्या, राहुल गांधीना वेळ हवा आहे.

blank