खेमेंद्र कटरे
गोंदिया-गेल्या १५ आँक्टोबरला महाराष्ट्र विधानसभेकरिता झालेल्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले.त्या निकालाकडे बघितल्यास गोदिया जिल्ह्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा ही भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या पराभवालाच कारणीभूत ठरल्याचे दिसून आले.पंतप्रधान मोदी यांनी गोंदियात ज्या उमेदवारासाठी सभा घेतली तो उमेदवार त्या निवडणुकीत qजकून आलाच नाही हे ८ आँक्टंोबरंच्या अंकात साप्ताहिक बेरार टाईम्सने सर्वात प्रथम स्पष्ट केले होते.ते वृत्त गोंदिया विधानसभेच्या निकालाकडे बघितल्यास खरे ठरले आहे..
पंतप्रधान मोदी ५ आँक्टोंबरला भाजपचे उमेदवार विनोद अग्रवाल यांच्या प्रचारसभेकरिता येऊन गेले होते.त्या आधी सन २००९ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार शिशुपाल पटले यांच्या जाहीर सभेकरिता नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना आले होते. त्यांची त्यावेळी सुद्धा इंदिरा गांधी स्टेडियम येथेच सभा झाली होती. त्यानंतरची ही दुसरी सभा होती. उल्लेखनीय म्हणजे त्यावेळी भाजप उमेदवाराचा दारुण पराभव होत अनामत रक्कम जप्त झाली होती.या निकालात भाजप उमेदवार जिंकू शकले नाही,मात्र दुसèया क्रमांकावर राहिले.
काँग्रेसच्या अग्रवालांची विजयाची हॅट्रिक
गोंदिया-गोंदिया विधानसभा मतदारसंघातून सलग तिसèयांदा विजय मिळून काँग्रेसचे गोपालदास अग्रवाल यांनी हॅट्रिक साधली आहे.गोंदिया मतदारसंघातूनच नव्हे तर गोंदिया भंडारा जिल्ह्यातून सलग तीनदा निवडून येणारे आमदार म्हणूनही गोपालदास अग्रवाल यांची नोंद झाली आहे.
२००४ मध्ये पहिल्यांदाच विधानसभेच्या रिंगणात उतरलेले गोपालदास अग्रवाल यांनी शिवसेनेचे उमेदवार रमेश कुथे यांचा पराभव केला होता.त्यानंतर २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीतही अग्रवाल यांनी शिवसेनेचे रमेश कुथे यांचा पराभव केला होता.
यावेळी २०१४ च्या निवडणुकीत सर्वच पक्ष स्वतंत्रपणे रिंगणात होते.या निवडणुकीत गोपालदास अग्रवालांच्या पराभवासाठी भाजप राष्ट्रवादी शिवसेनेने दंड थोपाटले होते.परंतु राष्ट्रवादी व भाजप त्यांना विजयापासून रोखू शकली नाही.गोंदिया विधानसभा मतदारसंघात गेल्या १० वर्षात आमदार स्थानिक विकास निधीच्या माध्यमातून केलेल्या विकासकामामुळेच मतदारांनी त्यांना खरी परत विकास काम करण्याची संधी दिली आहे.त्यांनी आपल्या मतदारसंघात विकासाची कामे केली ही पावतीच मतदारांनी त्यांना विजयातून दिली आहे.
अर्जुनी मोरगाव व तिरोडा विधानसभा मतदारसंघात भाजपने राखला गड कायम
अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातून दुसèयांदा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार व विद्यमान आमदार इंजि.राजकुमार बडोले यांनी विजय प्राप्त करून आपला मतदारसंघातील जनतेवरील विश्वास कायम टिकवून ठेवत गड कायम राखला आहे.
आमदार बडोले यांच्या विरोधात या मतदारसंघातील अनेक शक्ती एकत्रित आल्यानंतरही त्यांच्या विजयाला कुणीच थांबवू शकले नाही.भाजपमधील काही नाराज कंत्राटदार गटाला मात्र बडोलेंच्या विजयाने हादरा बसला आहे.बडोलेंच्या विजयाने त्यांनी त्या मतदारसंघात पहिल्या काळात नवीन असतानाही काम केल्याचाच विश्वास जनतेने दाखविला आहे.
तर तिरोडा विधानसभा मतदारसंघ सुध्दा भारतीय जनता पक्षाने आपल्याकडे कायम राखला आहे.विद्यमान आमदार डॉ.खुशाल बोपचे यांना उमेदवारी नाकारल्यानंतर या मतदारसंघातील निकाल बदलतो की काय अशी अपेक्षा होती, परंतु डॉ.बोपचे यांनी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व पंतप्रधान नरेंद्र मोंदीवर विश्वास ठेवत नाराजी दूर ठेवत भाजपसाठी काम करीत ही जागा भाजपचे उमेदवार विजय रहागंडाले यांच्या विजयाने कायम ठेवून पक्षाला या मतदारसंघात भाजपला विजय मिळवून दिला आहे.