गोंदिया- जिल्ह्यातील ४ विधानसभा मतदारसंघापैकी ३ मतदारसंघ भारतीय जनता पक्षाने आपल्या ताब्यात घेतले. काँग्रेसकडून १ जागा हिसकावून घेण्यात भाजपला यश आले.गोंदिया जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोंदीची सभा झाली परंतु त्या सभेचा इफेक्ट गोंदियात काही पडला नाही.३ मतदारसंघात काँग्रेसच्या पराभवाला राष्ट्रवादी काँग्रेस कारणीभूत ठरली.तर गोंदियात उमेदवाराची निवड भाजपची चुकल्याने फटका बसला.
अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाकडे बघितल्यास भाजपने ही जागा परत कायम ठेवली आहे.भाजपला बंडखोरी भोवणार असे चित्र असताना ते एकदम पालटले.मतदारांनी विद्यमान आमदाराने केलेल्या कामाची दखल आणि स्थिर सरकार भाजपच देऊ शकते हा दृष्टीकोन घेतल्यानेच विजय मिळविता आला.शिवसेनेच्या उमेदवार भाजपला qखडार पाडण्यात अपयशी राहिल्या.परंतु जर या मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे एकत्रितपणे लढले असते तर निकाल बदलले गेले असते.त्यातही काँग्रेसच्या बंडखोर २ उमेदवारांनी साडेसहा हजार मते घेऊन काँग्रेसची मते वजा केली.तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील मतविभाजनाचा लाभ भाजपला याठिकाणी मिळाला.
गोंदिया विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला अंतर्गत मतभेद आणि निवडणुक नियोजन अभावाचा फटका सहन करावा लागला यात शंका नाही.त्यातच बहुजन उमेदवार नाकारल्याचा सर्वात मोठा फटका बसला.शिवसेना मात्र अपेक्षेप्रमाणे मत घेऊ शकली नाही.एकंदरीत शिवसेना व राष्ट्रवादीच्या मतांना जोडले तर आत्तपर्यत सेना व राष्ट्रवादीची छुपी युती या मतदारसंघात होती, हे स्पष्ट झाले आहे.राष्ट्रवादी स्वतंत्र्य लढल्यानेच सेनेला फटका बसला.मतदारांना सेनेच्यावतीने दिलेला उमेदवार हा कुथे परिवरातीलच नकोसा झाल्याचे दिसून आले.बहुजन समाजपार्टी मतदारसंघात महत्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा होती,मात्र मतदारांनी सुध्दा बसपला नाकारले असून बसपला फक्त कॅडरचीच मते मिळाली.गोपालदास अग्रवालांना मात्र त्यांनी ग्रामीण भागात सतत ठेवलेला जनसपंर्क आणि केलेल्या कामाचा मोबदला मिळाला.काँगे्रसचे अग्रवालांना ग्रामीण जनतेनेच सर्वाधिक मते दिली उलट शहरात काँग्रेसला मतविभाजनाचा फटका बसला.ग्रामीण मतदारांनी काँग्रेसला पसंती दिल्याचे निकालावरुन दिसून आले.
तिरोडा मतदारसंघात भाजपमध्ये अंतर्गत कलह असताना अखेरच्याक्षणी शिवसेनेला सुध्दा मॅनेज करण्यात यश आले आहे.शिवसेनेला मॅनेज केल्यानेच भाजप उमेदवार मताधिक्य घेऊ शकला परंतु राष्ट्रवादीचे बंडखोर अपक्ष उमेदवाराने राष्ट्रवादीला चांगलाच फटका पोचविला.याठिकाणी बनसोड हे अपक्ष नसते तर कदाचित ही जागा राष्ट्रवादीच्याच कोट्यात गेली असती.काँग्रेस उमेदवाराला तालुकावादाचा फटका सहन करावा लागला. तिरोडा तालुका काँग्रेसच्या नेत्यांनी दिलेल्या फटक्यामुळे काँग्रेसला अनामत रक्कम सुध्दा वाचविता आली नाही.या निवडणुकीत बसप मात्र चांगलीच मागे राहिली जी गेल्या निवडणुकीत तिसèया क्रमांकावर होती
आमगाव विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला मोदी लहरची साथ मिळाली.तर काँग्रेस उमेदवाराप्रती जनतेत असलेला रोष काँग्रेसच्या विद्यमान आमदाराला पराभवासाठी कारणीभूत ठरले.भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेल्या रमेश ताराम यांच्यामुळे आणि राष्ट्रवादीचे नरेश माहेश्वरी यांचा २००४ च्या निवडणुकीत थोड्या मतानी रामरतन राऊत यांच्यामुळे झालेल्या पराभवाचे शल्य धुऊन काढण्यासाठी माहेश्वरी यांनी राऊत यांच्या पराभवासाठी केलेली मेहनत कामी आली.राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मिळालेली मते ही काँग्रेस,भाजपमधील असंतुष्ठाची होती.