भंडारा जि.प. निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी घेतली बैठक

0
9

मुंबई-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.श्री अशोक चव्हाण यांनी आज टिळक भवन येथे भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीची पूर्वतयारी तसेच संघटनात्मक बाबींवर चर्चा करण्यासाठी जिल्ह्यातील पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती.
या बैठकीत उपस्थित पदाधिका-यांनी आगामी निवडणूक व पक्ष संघटनेशी निगडित विविध विषयांवर मते मांडली. जिल्ह्यातील वर्तमान राजकीय परिस्थिती व समस्यांवर चर्चा करण्यात आली. बैठकीला मार्गदर्शन करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी भंडारा जिल्हा परिषदेत पक्षाला विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.
बैठकीला प्रदेश सरचिटणीस अॅड. श्गणेश पाटील, चिटणीस आशिष कुलकर्णी यांच्यासह माजी मंत्री बंडुभाऊ सावरबांधे, माजी आमदार आनंदराव वंजारी, अनिल बावनकर, सेवक वाघाये, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष झिया पटेल, प्रदेश पदाधिकारी प्रमिला कुटे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सीमा भुरे, माजी जि.प. अध्यक्ष राजकुमार मेश्राम, प्रमोद तितरमारे, युवराज वासनिक, जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष मधुकरराव लिचडे आदी उपस्थित होते.