माझ्या विजयाने मुंबई काँग्रेसच्या यशाची घोडदौड सुरू होईल

0
10

मुंबई-शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यावर नारायण राणे यांचा बालेकिल्ला असलेल्या मालवण मतदारसंघातील पोटनिवडणूक राणे विरुद्ध शिवसेना या लढतीने भलतीच गाजली होती. आता ‘मातोश्री’च्या अंगणात पुन्हा एकदा राणे विरुद्ध शिवसेना सामना रंगणार आहे.
मालवणमध्ये राणे यांनी शिवसेनेला चारीमुंडय़ा चीत केले होते, आता शिवसेना उट्टे काढण्यासाठी रिंगणात उतरली आहे. शिवसेनेचा सामना करण्याचे आव्हान असतानाच गेल्या वेळी या मतदारसंघात २४ हजार मते मिळालेल्या एमआयएमने उमेदवार उभा करण्याचा घेतलेला निर्णय राणे यांच्यासाठी त्रासदायक ठरणार आहे.
राणे यांनी आपल्या बालेकिल्ल्यात तेव्हा (२००५) शिवसेनेची धोबीपछाड केली होती. ती लढाई राणे यांच्या मालवणमध्ये झाले होती. आताची लढाई ‘मातोश्री’च्या अंगणात होत आहे. राणे यांनी शिवसेनेचा पराभव केल्यास शिवसेनेला ते फारच जिव्हारी लागणार आहे. यामुळेच शिवसेनेने सारी शक्ती पणाला लावण्याचा निर्णय घेतला आहे. सेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा शिवसेनेने शक्तिप्रदर्शन केले. राणर्े तयारीनिशी िरगणात उतरत आहेत. मुंबई काँग्रेसने राणे यांच्या मागे ताकद उभी करण्यावर भर दिला आहे. यामुळे राणे विरुद्ध शिवसेना हा पोटनिवडणुकीचा दुसरा अंक चुरशीचा ठरणार आहे.

शरद पवार यांचे आशीर्वाद
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. ते आमच्या मित्रपक्षाचे अध्यक्षही आहेत. मी भेट घेतल्यानंतर त्यांनी ताबडतोब त्यांचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना फोन लावला आणि मला पाठिंबा जाहीर करण्यास सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते पवारसाहेब यांचा आदेश मानून माझ्या पाठीशी उभे राहतील, असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला.