जिल्ह्याचा विकास व जनतेची समस्या सोडविणे हीच माझी प्राथमिकता – राज्यमंत्री फुके

0
8
– राज्यमंत्री फुके, खासदार मेंढे व आ. पुराम यांचा सत्कार
– भाजपा विस्तारित जिल्हा बैठक
गोंदिया,दि.02 : पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सबका साथ,सबका विकास व सबका विश्वास या ब्रीद वाक्याप्रमाणे कार्य करायचे आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर कार्यकर्त्यांनी आता विधानसभा निवडणुकीकरीता कामाला लागावे. मंत्री म्हणून मिळालेली जबाबदारी ही मोठी असून वेळ कमी आहे. या अल्पकाळात मोठे ध्येय डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास, प्रलंबित कामे व जनतेची समस्या सोडविणे हे आपले मुख्य उद्दिष्ट असून हीच आपली प्राथमिकता आहे असे प्रतिपादन राज्यमंत्री डॉ परिणय फुके यांनी केले.
ते 30 जून रोजी पवार बोर्डिंग येथे आयोजित भाजपा विस्तारित जिल्हा बैठकीत बोलत होते. जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीत प्रामुख्याने खासदार सुनील मेंढे, आ. संजय पुराम, आ विजय रहांगडाले, माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे, शिशुपाल पटले, माजी आमदार केशव मानकर, भेरसिंह नागपुरे, खोमेश रहांगडाले, नगराध्यक्ष अशोक इंगळे, प्रदेश कार्यकारणी सदस्य विनोद अग्रवाल, नेतराम कटरे, रचना गहाणे, जिल्हा महामंत्री संघटन वीरेंद्र अंजनकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अल्ताफ हमीद, जि.प.सभापती शैलजा सोनवाणे, विश्वजित डोंगरे, लायकराम भेंडारकर, न प उपाध्यक्ष शिव शर्मा, नंदकुमार बिसेन, दीपक कदम, गोरेगाव न पं अध्यक्ष आशिष बारेवार, घनश्याम पानतावणे, कशिश जयस्वाल, भाजयुमो जिल्हाध्यक्ष पंकज रहांगडाले,मंडळ अध्यक्ष सुनील केलनका, छत्रपाल तुरकर, अरविंद शिवणकर, ऍड येसूलाल उपराडे, प्रमोद संगीडवार, भाऊराव कठाने, डॉ लक्ष्मण भगत, परसराम फुंडे, विजय बिसेन, धनेद्र अटरे, उमाकांत हारोडे आदी उपस्थित होते.
या वेळी राज्यमंत्री फुके, खासदार सुनील मेंढे व अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या अध्यक्षपदावर नियुक्त झालेले आ. संजय पुराम यांचा जिल्हा भाजपच्या वतीने शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना फुके म्हणाले की आठवड्यातील तीन दिवस जिल्हात देणार असून दर शनिवारी जनता दरबार घेऊन जनतेच्या समस्या सोडविणार आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचून केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनेचा लाभ देण्यासाठी व त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी काम करण्याचे सांगितले.
खा. मेंढे यांनी जनतेच्या सेवेसाठी आपण नेहमीच तत्पर असून लोकसभा क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्वागीण विकास करण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे बोलले. आ. पुराम बोलतांना म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील आदिवासी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी व त्यांच्या विकास साधण्यासाठी मोठी जवाबदारी दिली असून ती सार्थकी ठरविणार असल्याचे सांगितले. जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनातून कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीकरिता व संघटन मजबूत करण्यासाठी प्रत्येक बूथ वर पक्षाने दिलेली कामे नियोजित वेळेत करण्याचे सांगून आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन केले. जिल्हा महामंत्री संघटन वीरेंद्र अंजनकर यांनी जिल्ह्यात नवमतदारांची नोंदणी करण्यासाठी व पक्षाची सदस्यता मोहीम राबविण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. या प्रसंगी आ विजय रहांगडाले, नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनीही मार्गदर्शन केले. या वेळी काँग्रेसचे विक्की बघेल सह रत्नारा व काटी जि प क्षेत्रातील अनेकांनी पक्षात प्रवेश केला. पक्षाचे दुपट्टे घालून त्यांचे स्वागत करण्यात आले. सभेचे संचालन जिल्हा प्रचार प्रसिद्धी प्रमुख जयंत शुक्ला यांनी केले. या वेळी जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी, सर्व लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.