भाकपने काढला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

0
11

गोंदिया ,दि.02ः-प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना दुसरा व तिसर्‍या टप्प्याचा निधी तसेच अतिक्रमण धारकांना जमिनीचे पट्टे तत्काळ देण्यात यावे या प्रमुख मागण्यांना घेऊन भारतीय कम्युनिष्ट पक्षाच्या वतीने १ जुलै रोजी मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.निवेदनात
प्रधानमंत्री घरकुल योजने अंतर्गत नगर पालिका, नगर पंचायत तसेच ग्रामीण क्षेत्राच्या लाभार्थ्यांना घरकुल कामासाठी पहिल्या टप्प्याचा निधी फेब्रुवारी महिन्यात देण्यात आला. नंतर दुसर्‍या व तिसर्‍या टप्प्याचा निधी एप्रिल मे २00९ पयर्ंत देणे गरजेचे होते. परंतु लाभार्थ्यांना दुसर्‍या व तिसर्‍या टप्प्याचा बांधकामाचा निधी मिळाला नाही. पावसाळा सुरू होणार असून लाभार्थी मंडप तयार करून राहत आहेत. त्यामुळे राहण्याचा प्रश्न निर्माण झाला असून आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. तसेच अतिक्रमण करणाठया शेतमजूर व भूमिहीन शेतकर्‍यांना अतिक्रमण जमिनीचे पट्टे देण्यास टाळाटाळ होत आहे. त्यामुळे अतिक्रमणधारक शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहत आहेत.
अतिक्रमण धारक भूमिहीन आदिवासी शेतमजुरांना तत्काळ पट्टे देण्यात यावे, तीन पिढय़ांची अट रद्द करण्यात यावी, प्रलंबित प्रकरणांना तत्काळ निकाली काढावे आदी मागण्यांचा समावेश होता.या मोच्र्याचे नेतृत्व राज्य कार्यकारणी सदस्य हौसलाल रहांगडाले, जिल्हा सचिव मिलींद गणविर, रामचंद्र पाटील, करुणा गणविर यानी केले. मोर्च्यात भारतीय कम्युनिष्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव रामचंद्र पाटील, शेखर कनोजिया, चरणदास भावे, भैयालाल शहारे, अशोक मेर्शाम, सी.के. ठाकरे, प्रल्हाद उके, परेश दुरुगकर, छन्नू रामटेके, वासुदेव ढोके, राकेश हिरदे यांनी गणवीर सहभागी झाले होते.