मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ३ व ४ ऑगष्टला गोंदियात

0
61

– महाजनादेश यात्रा, गोंदिया व अर्जुनी मोर येथे जाहीर सभा
गोंदिया,दि.02 : राज्य सरकारच्या पाच वर्षातील कामाचा हिशोब जनतेपुढे ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे कर्मस्थान असलेल्या अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथून १ ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे. ही महाजनादेश यात्रा ३ व ४ ऑगस्ट रोजी गोंदिया जिल्ह्यात दाखल होणार असून विविध ठिकाणी स्वागत व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी दिली.
ते शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी जिप अध्यक्ष नेतराम कटरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रचना गहाणे, जी प सभापती शैलजा सोनवाने,  दीपक कदम, महिला मोर्चा प्रदेश सचिव सिता रहांगडाले, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष भावना कदम,जिल्हा संपर्क प्रमुख संजय कुळकर्णी आदी उपस्थित होते. हेमंत पटले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लोकसभा निवडणुकीत जनतेने दिलेला आशिर्वादाबद्दल आभार मानण्यासाठी व मागील पाच वर्षाचा हिशोब देण्यासाठी ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता तुमसर मार्गे तिरोडा येथे महाजनादेश यात्रा दाखल होणार आहे. तिरोडा येथे यात्रेच्या स्वागतानंतर सायंकाळी ६ वाजता गोंदिया येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे. स्थानिक इंदिरा गांधी स्टेडियममध्ये ही भव्य जाहीर सभा होणार आहे. ३ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांचे गोंदिया येथे मुक्काम असून ४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता ते पत्रकार परिषद घेणार आहेत. सकाळी १०.३० वाजता गोरेगाव येथे यात्रेचे आगमन होणार असून स्वागतानंतर ११.३० वाजता सडक अर्जुनी, १ वाजता अर्जुनी मोर येथे मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर महाजनादेश यात्रा गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्याकडे रवाना होणार आहे. यात्रेची तयारी जिल्हास्तरावर सुरु असून यात्रेमध्ये फडणवीस सरकारच्या गेल्या पाच वर्षातील कामगिरीचे दर्शन घडविणारा एलइडी रथ यात्रेबरोबर असणार आहे. यात्रेदरम्यान होणाèया कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. या यात्रेचे प्रमुख प्रदेश सरचिटणीस आ. सुजीतqसग ठाकूर हे आहेत. या यात्रेचा समारोप नाशिक येथे ३१ ऑगस्ट रोजी होणार आहे. जिल्ह्यात यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्यांसोबत उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री डॉ. परिणय फुके, खा. सुनिल मेंढे, आ. राजकुमार बडोले, आ. प्रा. अनिल सोले, आ. विजय रहांगडाले, आ. संजय पुराम, जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, सर्व माजी खासदार-आमदार, नगराध्यक्ष, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, लोकप्रतिनिधी, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. महाजनादेश यात्रेच्या स्वागत व जाहीर सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी केले आहे.