मैत्री बंधुभावाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

0
10

गोंदिया,दि.02:- समाजात मैत्री, बंधुभाव कायम व्हावा या उद्देशाने साहित्यसम्राट, लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती प्रित्यर्थ विविध वर्ग कम्युनिटी संघटनांचा भाईचारा कार्यक्रम स्थानिक सुर्याटोला येथिल डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालय येथे मातंग समाज संघ व संविधान मैत्री संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला.
अण्णाभाऊ साठे हे एक थोर समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. मागासलेल्या समाजामध्ये जन्म झाले असल्याने त्यानी मेहनत करणारा पण आर्थिक दृष्ट्या दुर्बल, हाल अपेष्टा सहन करणारा समाज पाहिला. समतेचा पूढाकार व विषमता विरोधी भुमिका घेत त्यानी “ये आज़ादी झूठी है, देश की जनता भुखी है” असा नारा देत शासनाला चेतावलं। त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतीशीलतेवर आधारलेले होते. अण्णाभाऊ हे आंबेडकरवादी होते,त्यांनी लेखनीतुन “जग बदल घालुनी घाव, सांगून गेले भीमराव” असे क्रांतीकारी विचार मांडले. सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादाचा प्रभाव होता पण नंतर ते आंबेडकरवादी झाले. साहित्य क्षेत्रात त्यांचे प्रभुत्व होते आणि देश विदेशातील 27 भाषात त्यांचे साहित्य प्रकाशित करण्यात आले आहे. अशी माहिती अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमयी जिवनावर प्रकाश टाकताना मान्यवरानी आयोजित कार्यक्रमात दिली. उपस्थित मान्यवरानी आपल्या शब्दातुन वर्तमान परिस्थितीत अण्णाभाऊ साठे यांचे क्रांतिकारी विचार कृतीत आणने गरजेचे आहे असे प्रतिपादन केले.
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मातंग समाज संघाचे वसंता गवळी, ऐम्बस गोंदिया जिला प्रमुख यशवंत रामटेके, ओबीसी संघर्ष कृती समितिचे कैलाश भेलावे, युवा बहुजन मंचचे सुनिल भोंगाडे, रवि भांडारकर, संविधान मैत्री संघ संयोजक अतुल सतदेवे, संरक्षक महेंद्र कठाणे , अनमोल भालेराव प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाचे कुशल संचालन धर्मवीर चौहान यानी, तर उपस्थितांचे आभार व्यक्त नयन खोब्रागड़े यानी मानले.कार्यक्रम यशस्वीते करिता विशाल बावने, विशाल गवळी यानी अथक सहकार्य केेले.