31.1 C
Gondiā
Wednesday, June 24, 2026
Home राजकीय गडचांदूर नगर परिषदेत काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सविता टेकाम विजयी

गडचांदूर नगर परिषदेत काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सविता टेकाम विजयी

0
42

चंद्रपूर,दि.10 :- जिल्ह्यातील गडचांदूर नगरपरिषद निवडणूकीने भारतीय जनता पक्षाच्या मातब्बर नेत्यांना धक्का देत जनतेने नगराध्यक्ष पदावर काँग्रेसच्या सविता टेकाम विजयी झाल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलवीणारी ठरली असून माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि माजी खासदार हंसराज अहिर यांनी घेतलेल्या जाहीर सभात त्यांनी दिलेल्या आश्वासनाला भीक न घालता गडचांदूरकरानी भाजपला चक्क नाकारल्याचे चित्र निकालात स्पष्ट झाले आहे.यामधे काँग्रेसच्या नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार सविता टेकाम या निवडून आल्या असून पक्षीय बलाबल असे आहे.काँग्रेस-5, राष्ट्रवदी-4.. शिवसेना-5, शेतकरी सं.-1, व भाजपा-2. या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ज्योती कंठाळें ह्या प्रभाग क्रमांक ७ मधे विजयी झाल्याच्या घोषणा होत्या मात्र फेरमोजणीत त्या हरल्याचे जाहीर करण्यात आले.