31.1 C
Gondiā
Tuesday, June 23, 2026
Home विदर्भ देसाईगंज येथील घरकुल घोटाळ्याची चौकशी होणार

देसाईगंज येथील घरकुल घोटाळ्याची चौकशी होणार

0
29

गडचिरोली,दि.10–ः देसाईगंज शहरातील २०१२ मध्ये एकुण ११४ घरकुल वाटपात घोटाळा झाल्या प्रकरणी देसाईगंज येथील कनिष्ठ न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले असल्याने या प्रकरणात तत्कालीन पदाधिकारी अडचणीत येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे नगर पालिका क्षेत्रात चांगलीच खळबळ माजली आहे.प्राप्त माहितीनुसार माजी नगराध्यक्ष हिरालाल मोटवानी यांनी १२ डिसेंबर २०१७ रोजी या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात देसाईगंज पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र देसाईगंज पोलिसांनी या तक्रारीची दखलच घेतली नसल्याने मोटवानी यांनी अखेर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात धाव घेऊन २९ जानेवारी २०१९ रोजी तक्रार दाखल केली होती. त्यातक्रारीच्या अनुषंगाने येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय(कनिष्ठ स्तर) यांनी देसाईगंज पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत.