संजूभाऊ, आता आमच्या विकासाची दोरी तुमच्या हाती!

0
18

देवरी- आजही संजय पुराम तरुणांच्या गळ्यातील ताईत आहेत, ते आंबेडकरी विचारसरणीमुळेच. केवळ गरीब, आदिवासीच नाहीत तर बहुजन समाजातील कोणत्याही व्यक्तीवर अन्याय झाला, हे कळताच ते कधीही स्वस्थ बसले नाही. अन्यायकर्ता कितीही प्रभावी असो, त्याला सडो की पळो करून सोडण्यात संजय पुराम आघाडीवर असायचे. म्हणूनच त्यांना हक्काने कालपर्यंत आणि आजदेखील मतदार बिनधास्त संजूभाऊ अशीच हाक मारतात. ते आता आमदार झाले. काही वर्षापूर्वी भाजप आणि काँग्रेस हे पक्ष त्यांचे टार्गेट असायचे. परंतु, जनकल्याणासाठी ते आता भाजपमधून आमदार झाले. त्यामुळे ते टीका करीत असलेल्याच देवी-देवतांचेच पूजन करण्याची वेळ त्यांच्यावर आली. असो, त्यांनी आता रंजल्या-गांजलेल्या तीनही तालुक्यांचा विकास करावा, एवढीच अपेक्षा त्यांच्याकडून मतदारांना आहे.
आमगाव-देवरी विधानसभेचे आरक्षण अनुसूचित जमातीकरीता राखीव होताच संजय पुराम यांनी बहुजन समाज पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. २००९ च्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर संजय पुराम यांनी भाजपच्या तिकिटाच्या लालसेने प्रवेश केला. परंतु, त्यावेळी त्यांना तिकीट मिळाली नाही. नंतर २०१० या जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांच्या सुविद्य पत्नी सविता पुराम यांनी भाजपने पुराडा जिल्हा परिषद क्षेत्रातून उमेदवारी दिली. सौ. पुराम यांनी त्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष दुर्गा तिराले यांचा दणदणीत पराभव करीत यशाची माळ आपल्या गळ्यात टाकली. सध्या पुराम या गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये महिला व बालकल्याणपदी विराजमान आहेत. यावेळी एक प्रखर नेतृत्व व युवा वर्गातील पकड असलेल्या संजय पुराम यांना भाजप श्रेष्ठी आमदारकीसाठी तिकीट देणार, हे २०१० मध्ये स्पष्ट झाले होते. तरी त्यांच्या तिकीटाला नेहमीच विरोध होत असे. परंतु, ते आपल्यालाच तिकीट मिळणार म्हणून सतत प्रयत्नशील राहिले. यात त्यांना त्यांच्या सुविद्य पत्नी सविता यांचे खूपच सहकार्य लाभले. शेवटी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांनी तिकीट दिलीच. विरोध असतानासुद्धा ते प्रचंड बहुमताने निवडून आले. आता एकेकाळचे संजू आता संजूभाऊ झाले. आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रातून सर्वांत कमी वयाचे आमदार म्हणून एक कीर्तीमान त्यांनी प्रस्थापित केला. परंतु, आता संजयभाऊ यांच्यासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. आमगाव, देवरी आणि सालेकसा या अतिदुर्गम नक्षल प्रभावित क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून अनेक समस्या रेंगाळलेल्या आहेत. यात ग्रामीण भागातील मुख्य रस्त्यांची दयनीय अवस्था याचा सुद्धा समावेश आहे. या भागात शिक्षणाची समस्या आहे. सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याविषयी गैरसोय होत आहे. त्याचप्रमाणे qसचनाची पुरेशी सोय नसल्याने येथील बळीराजा देखील qचतेत आहे. येथील बेरोजगारांच्या हाताला काम नाही. अशा अनेक समस्या या विधानसभा क्षेत्राला भेडसावत आहेत. यापूर्वीच्या आमदारांनी या समस्यांकडे लक्षच दिले नाही किंवा त्यांचे प्रयत्न अपुरे पडले म्हणावे. यामुळे नेहमी आमगाव विधानसभा क्षेत्राच्या विकासाची हमी देणारे नवनिर्वाचित आमदार संजय पुराम यांच्याकडे या क्षेत्रातील लोकांच्या बèयाच अपेक्षा आहेत. तसा विचार केला तर आमगाव-देवरी क्षेत्रातील सर्वच अडचणी आणि समस्यांची पुराम यांनी चांगलीच जाण आहे. मात्र, आजपर्यंत ज्या बहुजनांच्या मदतीकरिता, प्रबोधनाकरीता ते सरसावत होते, तेच कार्य त्यांना यापुढे देखील सुरू ठेवता येतील काय? असा प्रश्न मात्र मतदारांच्या मनात अद्यापही कायम आहे.