25.9 C
Gondiā
Wednesday, July 8, 2026
Home राजकीय व्याज सवलत योजनेची मुदत ३० जून पर्यंत वाढवा-आमदार रहागंडाले

व्याज सवलत योजनेची मुदत ३० जून पर्यंत वाढवा-आमदार रहागंडाले

0
360

गोंदिया,दि.26ः- शासनाच्या पीक कर्ज योजनेतंर्गत जिल्ह्यातील विविध बँकांकडून शेतकऱ्यांनी पीककर्ज घेतले असून ३१ मार्च पुर्वी मुद्दलाच्या रक्कमेचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज सवलत देण्यात येते. मात्र राज्यात आणि जिल्ह्यातही संचारबंदी लागू असल्याने तसेच आर्थिक वर्ष संपन्याची मुदत  केंद्र सरकारने वाढविलेली असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरीता पीक कर्ज व्याज सवलत योजनेची मुदतवाढ ३० जून पर्यंत करावी अशी मागणी तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय रहागंडाले यांनी मुख्यमंत्री व कृषीमंत्र्याकडे केली आहे.
आमदार रहागंडाले  यांनी म्हटले आहे की, ‘कोरोना’ विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात सरकारने संचारबंदी लागू केली असल्याने व्याज सवलत मिळवण्यासाठी पीक कर्जाची रक्कम भरण्यासाठी शेतकऱ्यांनी बँकांमध्ये गर्दी करणे योग्य नाही. तसे झाले तर मोठ्या संख्येने ग्रामीण भागातील शेतकरी घराबाहेर पडून होणाऱ्या संपर्कामुळे ‘कोरोना’ ची लागण खेड्यापाड्यात होण्याची शक्यता तसेच सरकारने आर्थिक वर्ष संपण्याची वाढविलेली मर्यादा लक्षात घेता, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जाची परतफेड करण्याची व व्याज सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी  ३० जून पर्यंत मुदतवाढ द्यावी व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे.