26.3 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home राजकीय पालघर घटनेचा जिल्हा भाजपातर्फे निषेध

पालघर घटनेचा जिल्हा भाजपातर्फे निषेध

0
300
गोंदिया,दि.22ः पालघर जिल्ह्यात दोन साधू व एका वाहनालकाची जमावाने पोलीसासमोर हत्या केली. या मॉब लिंचिगचा जिल्हा भाजपाव्दारे निषेध करण्यात येत आहे. याप्रकरणातील जबाबदार आरोपीसह साधुंची सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलीसांना आरोपी करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी निष्पक्ष चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांची हकाल्लपट्टी करावी, अशी मागणी जिल्हा भाजप शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलवकडे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे.
निवेदन देताना माजीमंत्री राजकुमार बडोले, भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, आ. विजय रहांगडाले, माजी आ. गोपालदास अग्रवाल उपस्थित होते. निवेदनानुसार, १६ एप्रिल रोजी पालघर जिल्ह्यात दोन साधू व एका वाहनचालकाची जमावाव्दारे निघृन हत्या करण्यात आली. या घटनेची व्हीडिओ क्लिप १९ एप्रिल रोजी समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यावर सर्वत्र संताप व्यक्त झाला. विशेष म्हणजे, सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. गेल्या काही दिवसात अनेक गंभीर घडना घडल्या आहेत. ठाण्यात एका मंत्र्यांच्या बंगल्यात युवकाला मारहाण, कोट्यावधीच्या घोटाळ्यातील आरोपीला लॉकडावून काळात गृहखात्याच्या वरिष्ठ अधिकाºयाकडून प्रवास सवलतीचे पत्र, पोलीसांच्या उपस्थितीत साधू व त्यांच्या वाहनचालकांची जमावाव्दारे हत्या आदी घटना सरकारच्या कारभावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. या घटनांचा भाजपातर्फे निषेध करण्यात येत असून मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांची हकाल्लपट्टी करुन ठाणे येथील तरुणाला मारहाण प्रकरणात मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी जिल्हा भाजपाने केली आहे.