मुंबई,दि.18. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह इतर 9 आमदारांचा शपथविधी सोहळा विधानभवनात साध्या पद्धतीत पार पडला. सभापती रामराजे निंबाळकर यांनी दुपारी 1 वाजता उद्धव ठाकरेंसह इतर आमदारांना शपथ दिली. शपथविधीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते.
विधानपरिषद सदस्यपदी बिनविरोध निवड झालेले सदस्य
शिवसेनेमधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि डॉ. नीलम दिवाकरराव गोऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेसमधून शशिकांत जयवंतराव शिंदे आणि अमोल रामकृष्ण मिटकरी, काँग्रेसमधून राजेश धोंडीराम राठोड, तर भाजपमधून गोपीचंद कुंडलिक पडळकर, प्रवीण प्रभाकरराव दटके, रणजितसिंह विजयसिंह मोहिते-पाटील आणि रमेश काशिराम कराड यांनी आज आमदारकीची शपथ घेतली आहे.





