25.2 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home राजकीय गोरेगाव व गोंदियात अ.भा.किसान सभा व संघर्ष समितीने नोंदवला केंद्रसरकारचा निषेध

गोरेगाव व गोंदियात अ.भा.किसान सभा व संघर्ष समितीने नोंदवला केंद्रसरकारचा निषेध

0
416

गोंदिया,दि.2ः अ.भा. किसान सभा व अखिल भारतीय किसान संघर्ष समितीने भाजपच्या मोदी प्रणीत केंद्र सरकारच्या शेतकरी व कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ आज २७ मे रोजी देशव्यापी निषेध दिनांतर्गत गोंदिया तालुक्यातील अर्जुनी व आंभोरा या गावातील शेतशिवारात निदर्शने करण्यात आली.तसेच गोरेगाव येथेही निदर्शने करण्यात आली. अर्जुनी येथे महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजुर युनियनचे सरचिटणीस शिवकुमार गणविर,किसान सभेचे जिल्हा सचिव रामचंद्र पाटील,भाकप तालुका सचिव प्रल्हाद उके याच्यां नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. यात लिखीराम तुरकर,जितेंद्र गजभिए,रामलाल हरिणखेडे,फेकन कटरे,क्रांती गणविर,ऊमेदलाल कटरे इत्यादी शेतकरी सहभागी झाले. आंभोरा येथे छन्नु रामटेके (भाकपा तालुका सहसचिव)यांचे नेतृत्वात शारजा शेंद्रे ,नानेश्वर उरकुडे,संतोष पटले,सुरेश चौधरी,प्रविण वाघाडे,विमला रामटेके,संजय गणविर,आंनदा मेंढे व गोरेगाव येथे महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य कार्यकारणी सदस्य हौसलाल रहांगडाले,कल्पना डोंगरे,चैयतराम दियेवार,तालुका सचिव चरणदास भावे हे निषेध आंदोलनात सहभागी झाले होते.blank

२०कोटी प्रवाशी मजुरांना त्यांच्या गावी परत पोहचवण्यासाठी मोफत ट्रेन,बसची व्यवस्था करणे व ते घरी पोहचल्यावर अन्न आणि रोजगाराची,योग्य वेतनाची व आरोग्य सेवेची हमी द्यावे,शेतकरी शेतमजुरांची संपुर्ण कर्जमुक्ती करावी,स्वामीनाथन आयोगाच्या सिफारशी लागू करणे,खरीप हंगामासाठी सर्व शेतक-यांना बॅंकाकडून नविन पिक कर्जाची हमी,व मोफत बि-बियाणे व खताचा पुरवठा करणे, गोंदिया जिल्ह्यात रबी धान पिक विक्री साठीचे पुरेशे सरकारी धान खरेदी केंद सुरू करणे व त्वरित चुकारे करणे, रबी हंगामात सडलेल्या वा न विकल्या गेलेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळणे,आदि मागण्यांचे निवेदन प्रधानमंत्री यांना पाठविण्यात आले.