भंडारा,दि.२३-भारतीय जनता पक्षाच्यावतीने राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केलेल्या पोकळ घोषणेचा जाब विचारण्याकरीता तसेच शेतकèयांना पिक कर्जासोबतच कर्जमाफी करीत सरसकट आकारलेले वीज बिल माफ करण्याच्या मागणीकरीता आंदोलन करीत निवेदन सादर करण्यात आले.विशेष म्हणजे संचारबंदी असून पाच व्यक्तीच्यावर अधिक व्यक्ती एकत्र येऊ शकत नसतांना खा.सुनिल मेंढे यांच्या नेतृत्वात या संचारबंदीच्या नियमाला मोडून जिल्हाधिकारी कार्यालयावर पायदळ मोर्चा काढून सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.जिल्ह्याधिकाèयांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले.यावेळी खासदार सुनिल मेंढे,चैतन्य उमाळकर,शहर अध्यक्ष संजय कुंभलकर,विनोद बांते,प्रशांत खोब्रागडे,अरविंद भालादरे,नरेश बोंद्रे, करमचंद वैरागडे,हेमंत बांडेबुचे,मयूर बिसेन,विकास मदनकर,मंगेश वंजारी,मिलिंद मदनकर,अजीज शेख,राजेश टिचकुले,अजय ब्राम्हणकर,रोशन काटेखाये,भुपेश तलमले,शैलेश मेश्राम,नंदकिशोर पारधी, सय्यद फईम,ओजल शरणागत,साधना त्रिवेदी,वनिता कुथे,आशा उईके,गीता सिडाम,रोशनी पडोळे,माला बगमारे,प्रीती जांभूळकर,प्रीती गोसेवाडे तसेच भाजपा जिल्हा व शहर पदाधिकारी व नगरसेवक, नगरसेविका व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते
कोरोना प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे, विदयुत विभागाने मीटर रीडिंग न घेता २ महिने सरासरी बिल आकारले, आणि चालू महिन्यात बिलाची संपूर्ण आकारणी करण्यात आल्याने बिलाची रक्कम सर्व सामान्यांच्या खिशाला न परवडणारी आहे. तसेच अजूनही सर्व व्यवहार सुरळीत न झाल्याने बेरोजगारीचे सावट आहेच. या परिस्थितीत कुणाचेही वीज कनेक्शन खंडित करू नये तसेच वीज ग्राहकास बिलाचा भरणा ह्फ्त्याने भरण्याची मुभा द्यावी तसेच महत्त्वाचे म्हणजे अतिरिक्त, वाढीव आलेले बिल तात्काळ कमी करण्याच्या सूचना खा. मेंढे यांनी कार्यकारी अभियंता शैलेश कुमार सिंग यांना केल्या.





