बीसीसीआय कार्यकारिणी बैठक १८ ऑक्टोबरला

0
19

मुंबई ,दि. १0– बीसीसीआयची स्थगित करण्यात आलेली कार्यकारिणी बैठक १८ ऑक्टोबरला होईल. कार्यकारिणीची नियोजित बैठक २८ ऑगस्टला होणार होती.
मात्र आयसीसीचे अध्यक्ष आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या उपस्थितीवरून बैठक स्थगित करण्यात आली. नियोजित अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्या अकाली निधनानंतर माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांनी पुन्हा अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. स्वच्छ प्रशासनासह त्यांना अनेक बदल अपेक्षित आहेत. त्यामुळे आगामी कार्यकारिणी बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा अपेक्षित आहे.