राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत कोल्हापूर प्रथम

0
19

आमगाव दि.१४,- : गोंदिया जिल्हा योग असोसिएशनद्वारे शनिवारी आणि रविवारी झालेल्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत कोल्हापूर विभागाने सर्वाधिक गुण प्राप्त करून विजेतेपद प्राप्त केले. स्पर्धेत महाराष्ट्रातील ८विभागातून ३१ जिल्ह्यातील खेळाडू सहभागी झाले होते.
बक्षीस वितरण आ. संजय पुराम यांच्या अध्यक्षतेखाली कृऊबासचे सभापती केशवराव मानकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सविता पुराम, क्रीडा अधिकारी अनिल निमगडे, प्राचार्य डॉ.दिलीप संघी, डॉ. क्षिरसागर, सतीश मोहगावकर, पोलीस निरीक्षक बी.एन. औंटी, नटवरलाल गोहिल आदी मान्यवर उपस्थित होते.
आमगावसारख्या लहान गावात इतके खेळाडू येणे आणि मोठी स्पर्धा होणे ही गौरवाची बाब आहे. खेळाडूंनी या स्पर्धेत यश प्राप्त करून आई-वडिलांचे नाव लौकिक करावे, असे आवाहन आ. संजय पुराम यांनी केले. तर खेळाडूंच्या पाठीशी भवभूती शिक्षण संस्था नेहमीच उभी राहते, भविष्यातही विविध स्पर्धांचे आयोजन आम्ही करू. काही अडचणी आल्या असल्यास माफी मागतो, असे भावनिक उद्गार पुरस्कार वितरक केशवराव मानकर यांनी काढले. याप्रसंगी नगरातील पत्रकार व स्पर्धेसाठी सहकार्य करणार्‍यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी योगपटूंनी डोळ्याचे पारणे फेडणारे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची मने जिंकले. संचालन विनायक अंजनकर यांनी केले.
कार्यक्रमासाठी जिल्हा अध्यक्ष सुरेश कोसरकर, चित्रा धोमणे, शशांक कोसरकर, लालचंद पारधी, बेनीमाधन कावळे, डी.आर.मेश्राम, प्रा. रंजीतकुमार डे, झनक बघेले, भरत चुटे, अशोक मोदी, सुभाष मेश्राम, हेमंत चावके, के.टी.बिसेन, रमेश साखरे, मनोज कोसरकर, संतोष पेंदोर, उज्वल बैस, निखिल कोसरकर, जगदिश बडगे, खेमचंद शहारे, संजय राऊत, माधुरी परमार आदींनी सहकार्य केले.