राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी कामकाजावर बहिष्कार

0
13

अर्जुनी-मोरगाव दि.१४: राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर डेटाबेस अद्यावत करण्याच्या कामावर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनांनी बहिष्कार घातला आहे. अशैक्षणिक कामाला उच्च न्यायालय मुंबई यांची स्थगिती असल्यामुळे प्रगणकाचे साहित्य परत करण्याचे निवेदन संघटनांच्या वतीने तहसीलदारांना शनिवारी देण्यात आले.
राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर डेटाबेस अद्यावत करण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. तालुकास्थळी याचे साहित्य आलेले आहे. याकामी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. सध्या विद्यार्थ्यांचा परीक्षा कालावधी सुरू आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम राबविला जात आहे. या कामकाजामुळे शैक्षणिक कार्यात व्यत्यय येऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे म.रा. प्राथमिक शिक्षक समिती व शिक्षक संघाच्या संघटनांनी राज्य व जिल्हा स्तरावरून या कामाचा विरोध करून बहिष्कार घातला आहे. तसे जिल्हाधिकारी व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहेत. उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्णयाप्रमाणे अशैक्षणिक कामाला स्थगिती देण्यात आली. मात्र सातत्याने शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचा बोजा लादला जात आहे. याचा विरोध म्हणून या कामकाजावर बहिष्कार घालण्यासाठी शनिवारी शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन तहसीलदारांना निवेदन दिले.यात शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सिध्दार्थ खोब्रागडे, डी.एल. कोकोडे, कैलास हाडगे, मनोहर नाकाडे, श्रीकृष्ण कहालकर, रमेश संग्रामे, अशोक दिवटे, दिलीप लोधी, रमेश गहाणे, पी.के. लोथे, अरविंद नाकाडे, एस.एल. ब्राम्हणकर, अंजिता मेंढे, मनोहर मोटघरे, विनोद बडोले, आशिष कापगते, मोहन नाकाडे, जगदिश नाकाडे यांचा समावेश आहे.