उद्यापासून भजेपार येथे प्रौढ कबड्डी स्पर्धा 

0
8
भजेपार,दि.1 : सालेकसा तालुक्यातील भजेपार येथे स्थानिक नवयुवक प्रौढ कबड्डी क्लबच्या वतीने उद्यापासून तीन दिवसीय भव्य प्रौढ कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद््घाटन आमदार संजय पुराम यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडाधिकारी अशोक गिरी राहणार आहेत. २,३ आणि ४ जानेवारी दरम्यान चालणाNया भव्य कबड्डी स्पर्धेत भरगच्च पुरस्कार ठेवण्यात आले आहे. प्रथम पुरस्कार ११ हजार १११, द्वितीय पुरस्कार ८ हजार ८८८, तृतीय पुरस्कार ५ हजार ५५५ यासह प्रोत्साहनपर बक्षीसे आहेत. इच्छुक क्रीडामंडळांनी सहभागी होण्यासाठी आयोजकांशी संकर्प साधावा, असे आवाहन आयोजक समितीचे अध्यक्ष चंद्रकुमार पाथोडे, उपाध्यक्ष हेमंत बहेकार, सचिव विजय बहेकार, सहसचिव हेमंत चुटे आदींनी केले आहे.