लॉन टेनिस व बास्केटबॉल कोर्टचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

0
37

गोंदिया,दि.12 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा संकुल समिती, गोंदियाच्या वतीने नाविण्यपुर्ण योजना अंतर्गत उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक लॉन टेनिस व बास्केटबॉल कोर्टचे पालकमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. आमदार मनोहर चंद्रिकापूरे, आमदार विनोद अग्रवाल, जिल्हाधिकारी नयना गुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड, माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, कीडा मार्गदर्शक, शिक्षक, खेळाडू व कीडाप्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.

         पालकमंत्री श्री. तनपुरे यांनी लॉन टेनिस खेळून कोर्टचे उद्घाटन केले. आरोग्य व फिटनेससाठी मैदानी खेळ आवश्यक असून प्रत्येकांनी किमान एक खेळ खेळण्याचा छंद जोपासायला हवा असे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेतून जिल्हा क्रीडा संकुल येथे अत्याधुनिक लॉन टेनिस व बास्केटबॉल कोर्ट बनविण्यात आले आहे. याचा लाभ खेळाडूंना होणार असून या सुविधेमुळे जिल्ह्यात चांगले खेळाडू तयार होण्यास मदत होणार आहे.

          पालकमंत्री तथा अध्यक्ष जिल्हा क्रीडा संकुल समिती, गोंदिया प्राजक्त तनपुरे, यांनी  गोंदिया जिल्ह्यात क्रीडा क्षेत्राकरीता पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी तसेच क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार प्रसार, जोपासना व प्रतिभावंत खेळाडू तयार व्हावेत, यासाठी अद्ययावत क्रीडा सुविधा निर्माण करण्याचा निश्चितपणे शासनामार्फत प्रयत्न केला जात असल्याचे यावेळी सांगितले. तसेच सन 2021-22 या वर्षात नाविण्यपुर्ण योजने अंतर्गत पॉलीग्रास फुटबॉल मैदान व शुटिंग रेंजच्या क्रीडा सुविधा लवकरच जिल्हा क्रीडा संकुलामध्ये निर्माण होणार आहेत. त्यांचा फायदा जिल्हयातील खेळाडू व क्रीडाप्रेमींना निश्चितपणे होणार आहे.

         कार्यक्रमाचे संचालन व आभार ए.बी. मरसकोले, क्रीडा अधिकारी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नाजुक उईके, क्रीडा मार्गदर्शक, शकुणाल भांडारकर आर्किटेक्ट, रोहीत वाधवानी, रोहीत जैन (कंत्राटदार), धनंजय भारसागडे, विशाल ईश्वरकर, अनिल पांडे, अनिल शहारे, विशाल ठाकुर, अंकुश गजभिये, कमलेश बारेवार, विनेश फुंडे, अतुल बिसेन, कृष्णकमल खोब्रागडे, अनुप गेडाम, शिवचरण चौधरी, रवि परीहार, श्रीमती माधुरी परमार, कु. जयश्री भांडारकर यांचे सहकार्य लाभले.