उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

0
80

गोंदिया,दि.12 : जिल्ह्यातील विविध शासकीय विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांचा राज्यमंत्री नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महाराष्ट्र राज्य तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सत्कार करण्यात आला. जिल्हा आढावा बैठकीत हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

         आमदार मनोहर चंद्रिकापूरे, जिल्हाधिकारी नयना गुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, उपवनसंरक्षक कुलराज सिंह, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी व विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

          निवडणूक विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीचे योग्य विनियोजन करणाऱ्या जिल्हा नियोजन अधिकारी कावेरी नाखले, भूमी अभिलेख्याचे संगणकीकरण करण्यात पुढाकार घेणाऱ्या जिल्हा भूमी अभिलेख अधिकारी रोहिणी सागरे, जिल्हा खनिकर्म अधिकारी सचिन वाढवे, जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड, माविम जिल्हा व्यवस्थापक संजय संगेकर, जिल्हा सांख्यिकी अधिकारी रुपेशकुमार राऊत, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी धनंजय देशमुख, मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण, तहसीलदार नरसय्या कोंडागुर्ले,  उपअभियंता संजय कटरे, सहाय्यक जिल्हा क्रीडा अधिकारी अनिराम मरसकोल्हे, सांख्यिकी सहाय्यक निकलेश दडमल, संदीप पवार, अंकीतकुमार अग्रवाल, प्रशांत टेंभूरकर, नरेश वानखेडे व अव्वल कारकून  धोंडीराम कातकडे यांचा यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.