जिल्हास्तरीय क्रीडा प्रशिक्षण शिबिर

0
13

भंडारा, दि. 2 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यामाने जिल्हास्तर क्रीडा प्रशिक्षणाचे आयोजन 3 ते 13 मे 2022 या कालावधीत सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत व सायंकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत जिल्हा क्रीडा संकुल भंडारा येथे करण्यात आले आहे.

या प्रशिक्षणात प्रामुख्याने व्हॉलीबॉल, सॉफ्टबॉल, हॅण्डबॉल, धनुर्विद्या, हॉकी, कराटे, तलवारबाजी, बास्केटबॉल, बॅडमिंटन इत्यादी खेळ प्रकाराचा समावेश राहणार आहे. संबंधित खेळाचे तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून खेळाडूंचा सर्वांगीण विकास साधन्याचा प्रयत्न असणार आहे. तरी भंडारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळा, महाविद्यालयातील खेळाडूंनी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम यांनी केले आहे.