सामाजिक न्यायाच्या योजनांचा जागर पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते स्टॉलचे उद्धाटन

0
12
वाशिम दि.०२ – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून साकारलेला सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा जागर कार्यक्रम लाखो जनतेपर्यंत पोहोचण्यास मदत झाली.स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षे आणि १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील प्रत्येक गावात योजनांची माहिती पोहोचविण्याचे उद्दिष्ट जागर कार्यक्रमांच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाने ठरविण्यात आले होते.योजनांची माहिती व प्रसारासाठी विभागाने युद्धपातळीवर यंत्रणा कार्यान्वित केली होती.प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावात विभागाच्या योजनांची माहिती पुस्तके, माहिती पत्रिका पोहोचविण्यात आली.
वाशिम येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते या स्टॉलचे उद्घाटन १ मे रोजी ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमानंतर पोलीस कवायत मैदान येथे करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे,आमदार ऍड किरणराव सरनाईक,जिल्हाधिकारी वसुमना पंत,पोलीस अधीक्षक बच्चनसिंह,सहाय्यक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम व समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ प्रामुख्याने उपस्थित होते.
स्टॉलला भेट देणाऱ्यांना समाज कल्याण विभाग व विविध महामंडळाच्या सर्व योजनांची माहिती देणारी माहिती पत्रिका तसेच माहिती पुस्तिका वाटप करण्यात आली. विभागाच्या योजनांच्या बाबतीत जनजागृती करून तळागाळातील व्यक्तीला माहिती मिळण्यास मदत झाली.
 सामाजिक न्याय विभागाचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी परभणी येथे या कार्यक्रमाचे उद्घाटन करून उपस्थित असलेल्या सर्वांना विभागाच्या योजनांची माहिती करून दिली. समाज कल्याण विभागाचे राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम यांनी भंडारा येथे कार्यक्रमात सहभाग नोंदविला. मुंबईत पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील स्टॉलला भेट दिली.समाज कल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे व समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला व संपूर्ण राज्यात कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
राज्यात प्रथमच अभिनव पद्धतीने शासनाच्यावतीने असा उपक्रम राबविण्यात आल्याने समाजातील सर्व स्तरातून विभागाचे अभिनंदन करण्यात येत आहे. समाज कल्याणचे।सहाय्यक आयुक्त, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी ,कर्मचारी यांच्या बरोबरच बार्टीचे अधिकारी – कर्मचारी,तालुका समन्वयक, समतादूत ,स्वयंसहायता युवा गटाचे प्रतिनिधी हे गावागावात पोहोचले. त्यांनी योजनांची माहिती जनतेला करून दिली.