खेळाडूंची प्रतिभा ओळखून योग्य संधी देण्याची गरज : युवा नेते रविकांत खुशाल बोपचे

0
15

तिरोडा : क्रीडा प्रतिभा गावातच वास्तव्य करते. मात्र खेळाडूंची प्रतिभा ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शन व संधी देण्याची गरज आहे. खेळाडूंनी सामंजस्याने उत्साहवर्धक वातावरणात खेळ खेळावे व प्रतिभा दाखवावे. स्पर्धेच्या आयोजनामुळे खेळाडूंच्या कला गुणांना वाव मिळत असून प्रतिभा कौशल्य निखरण्यासाठी स्पर्धेच्या अधिक आयोजनाची गरज आहे. असे मत युवा नेते रविकांत खुशाल बोपचे यांनी व्यक्त केले.

तालुक्यातील ग्राम पिंडकेपार येथे रात्रकालीन क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन युवा नेते रविकांत बोपचे यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी खेळाडूंना शुभेच्छा देत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.याप्रसंगी रविकांत बोपचे यांच्यासह जिप सदस्य जगदीश बावनथडे, मदन पटले, तुंडीलाल शरणागत, भारती झगेकार, जगदीश जांभुळकर, मनोहर पटले, युजित शरणागत, प्रमिला शरणागत, आरती साखरे, गजानन मेश्राम, जगदीश नेवारे, गणेश बघेले आदिंसह गावातील प्रतिष्ठित नागरिक व क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.