राष्ट्रीय खो खो स्पर्धेत वनी चा ‘परिमल’ 

0
12
पवनीच्या इतिहासातील पहिला राष्ट्रीय खो-खो खेळाडु ‘परिमल’
पवनी : ३२ वी किशोर/किशोरी खो खो गट राष्ट्रीय खो खो स्पर्धा ही २९ ऑक्टोंबर ते ०३ नोव्हेंबर २०२२ ला फलटण जिल्हा सातारा येथे आयजित करण्यात आली होती. या मध्ये विदर्भ संघाची खेडाळुंची निवड ही ०९ ऑक्टोंबर २०२२ ला काटोल येथे घेण्यात आली होती या मध्ये पवनी चा परिमल सदानंद लांजेवार याची निवड करण्यात आली होती.
 पवनी येथे सक्सेना शाळेच्या मैदानावर मोफत खो खो चे प्रशिक्षण देण्यात येते या मैदानावर अनेक विद्यार्थी सकाळ सायंकाळी एकत्र येऊन खेळ खेळतात,या मध्ये परिमल हा सुद्धा खो खो चा खेळाडू असून त्याचा खेळ बघून  त्याची निवड फलटण जिल्हा सातारा साठी करण्यात आली होती त्यात झालेल्या स्पर्धेमध्ये त्याला खेळण्याची संधी मिळाली .काल दिनांक 3 नोव्हेंबर ला राष्ट्रीय स्पर्धा खेळून फलटण जिल्हा सातारा वरून परत पवनी ला आला,पवनी शहरात खेळाबद्दल
वातावरण तयार करणारे व धावपळ करून खेळाडुंना लागेल ती मदत करणारे त्याचे मार्गदर्शक डोन्ट वरी ग्रुप चे व सिटीझन फोरम पवनी चे योगेश बावनकर, संघर्ष अवसरे, निखिल शहारे, धृप बोटकुले निखिल धमदे, आशुतोष रायपुरकर, श्रेयश कुरझेकर यांनी मेहनत घेतली असून त्यांना परिमल चा अभिमान वाटतो.
  विदर्भ खो खो असोशियन चे सचिव श्री सुधीर निंबाळकर सर व भंडारा जिल्हा खो खो असोशियन चे सचिव श्री पुरूषोत्तम सेलोकर सर यांनी सुध्दा परिमल चे अभिनंदन केले. भविष्यात पवनी मधून पुन्हा उत्तम खेळाडू घडतील आणि पवनी चा नाव उंचावतील त्यासाठी पवनी वासीयांचे सहकार्य आणि नगर परिषद ची मदत युवकांना मिळणे आवश्यक असून परिमल च्या माध्यमातून सुरुवात झाली आहे आशा आहे पवनीतुन उत्तम खेळाडु लवकरच तयार होतील असे डोन्ट वरी चे व सिटिझन फोरम चे योगेश बावनकर व संघर्ष अवसरे यांनी सांगितले व यासाठी डोन्ट वरी ग्रुप व सिटिझन फोरम सदैव पुढाकार घेईल.