खजरी उच्च माध्यमिक विद्यालयाची सुविधा राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेत चमकली

0
10

सडक अर्जुनी,दि.03ः– स्वांतत्र्याच्या अमृत महोत्सवी क्रिडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पूणेच्या वतिने शैक्षणिक सत्र 2022-23 मध्ये विविध सांघिक व मैदानी स्पर्धांचे तालुका,जिल्हा विभाग व राज्य स्तरावर आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा क्रीडा परीषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पूणेच्या वतिने ता.29 जानेवारी रोजी जिल्हा क्रीडा संकुल पूणे राज्य स्तरीय मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेकरीता विभागावर अव्वल आलेल्या क्रीडापटू सहभागी होण्यासाठी पात्र होते.आदिवासी विकास हायस्कूल व कला,विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय खजरी येथील कु.सुविधा गोवर्धन बहेकार ही 19 वर्षवयोगटाखालील 400 मीटर राज्यस्तरावरील स्पर्धेत सहभागी झालेली होती.तीने राज्यस्तरावरील या स्पर्धेत पाचवा क्रमांक पटकावून शाळेचे नाव उंच केलेले आहे.त्या प्रित्यर्थ शाळा प्रशासनाच्या वतिने ता.2 फेब्रुवारी,गुरूवारी कु.सुविधा व त्यांचे कुटुंबीय यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.अध्यक्ष स्थानी प्राचार्य खुशाल कटरे होते.
या प्रसंगी विचारमंचावर पर्यवेक्षक रविशंकर कटरे,क्रीडा शिक्षक सुनिल गेडाम, उमावि प्रभारी प्रा.वाय.टी.परशुरामकर, वरिष्ठ शिक्षक के.जे.लांजेवार, डी.डी.रहांगडाले,विज्ञान शाखा प्रभारी प्रा.संजय येळे, प्रा.के.के.तागडे,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.प्रास्ताविक क्रीडा शिक्षक सुनिल गेडाम यांनी प्रस्तुत केले.संचालन व आभार प्रा.सुरज रामटेके यांनी मानले.